हे बंध रेशमाचे!


“दप्तरात काय काय पाठवू?” यशची आई उत्साहात विचारत होती. मी म्हटलं, “रुमाल, चड्डी, डबा आणि वॉटरबॅग.” त्यावर त्यांची पुन्हा स्पष्टीकरणात्मक विचारणा “ते आहेच हो; पण अभ्यासासाठी पाटी, पेन्सिल, वही, पुस्तक काय द्यायचं?” माझं पुन्हा अधिक तपशिलाचं स्पष्टीकरण - “काहीच नाही. आपल्या शाळेत खूप साहित्य आहे. त्याचाच उपयोग करून आपण शिकवतो. बालवाडीत मुलांना काहीच लिहायला शिकवत नाही. फक्त भरपूर चित्रं काढायला देतो. त्यासाठी जाड खडू आणि पाठकोरे कागद शाळेतूनच मिळतात.” असं सांगितल्यावर आता आपला यश लेखनात मागे पडणार की काय, अशा धाकधुकीनंच तिनं यशसाठी प्रवेश घेतला... 

बालवाडीच्या मुलांना भारंभार अभ्यास देणाऱ्या आपल्या सभोवतालच्या शाळा आपल्याला माहीत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक येथील आनंद निकेतन शाळेतील शिक्षिका उज्ज्वला मोरे आणि मुक्ता पुराणिक बालवाडीच्या वर्गांतील आपल्या अध्यापनपद्धतीविषयी सांगतायत -

बालवाडीत तीन वर्ष आमच्याबरोबर राहिलेली मुलं जेव्हा पहिलीत जातात, तेव्हा आम्हांला अगदी चुटपूट लागते आणि ती पण इतकी जीव लावतात, की रोज काहीतरी सांगायला, दाखवायला येतात. आज सगळे जण त्यांच्या वर्गात बोलावत होते. त्यांनी स्वतः तयार करून लिहिलेल्या गोष्टी वर्गात लावल्या होत्या. ‘ताई माझी वाचा, माझी वाचा’ असं चाललं होतं. पाच-सहा ओळींच्याच गोष्टी, पण प्रत्येकाची वेगळी कल्पना. वाचून खूप बरं वाटलं आणि याच मुलांच्या बालवाडी प्रवेशाच्या वेळचे कितीतरी प्रसंग आठवले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण. पालकत्व

प्रतिक्रिया

  1. nvaishali1

      4 वर्षांपूर्वी

    लेखात अतिशय उत्तम माहीती

  2. pmadhav

      4 वर्षांपूर्वी

    खुप छान... अशी समज दुर्मिळ होतं आहे... आपलं वैयक्तिक कौतुक आणि आपल्या शाळेच्या कामाला खुप शुभेच्छा

  3. ssuchita

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख

  4. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    अतिउत्तम। शिक्षक यांना हार्दिक शुभेच्छा।



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen