शब्दांच्या पाऊलखुणा - हिरवेपणाची हरितालिका! (भाग पंधरा)


संस्कृतमध्ये हरितालिका किंवा हरिताली म्हणजे दूर्वा. प्राकृतमध्ये त्याचा अपभ्रंश ‘हरिआली’ झाला. त्यावरून हिंदीमध्ये ‘हरियल’ तर मराठीमध्ये ‘हरळी’ शब्द तयार झाला. हरळीला ग्रामीण भागात ‘हरियाळी’ असंही म्हटलं जातं. दूर्वा गणपतीस प्रिय असली तरी ते एक प्रकारचे गवतच आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या गवताचा उल्लेख ऋग्वेदातही आढळतो. या गवताचं वैशिष्ट्य म्हणजे ते मुळासकट उपटले किंवा उन्हाळ्यात जळून गेले तरी त्याचे बीजांश जमिनीत टिकून राहतात आणि पाऊस पडला की पुन्हा हे गवत तरारून वर येते. अनेक प्रकारचे त्रास, छळ सोसूनही तगून राहणाऱ्या व्यक्तीला म्हणूनच ‘हरळीची मुळी’ म्हटलं जातं.

-----------------------------------------------

भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजे गेल्या शुक्रवारी घरोघरी हरितालिका पूजली गेली. अन् त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला गणेशाचे आगमन झाले. सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा म्हणून हरितालिकेचे व्रत करतात. या व्रतासंबंधी शंकर – पार्वतीच्या जन्मोजन्मीच्या कितीतरी कथा – कहाण्या तुम्ही ऐकल्या अन् सांगितल्याही असतील. या आपल्या पुराणातील प्रेमकथाच म्हटल्या पाहिजेत. 

हरितालिका व्रताची एक कथा अशी आहे – पार्वती  उपवर झाल्यावर तिचा पिता पर्वतराज हिमालयाने नारदाच्या सल्ल्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्द व्युत्पत्ती

प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती.

  2. jrpatankar

      4 वर्षांपूर्वी

    असेच लिहित रहा.

  3. कविता अजय भागवत

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती मिळाली

  4. pranavs

      4 वर्षांपूर्वी

    आपल्या भारत देशात जे सण साजरे होतात ते आपण डोळे मिटून करतो असं मला कधी कधी वाटतं. कारण आपण त्या सणामागचा अर्थच बघत नाही आणि जर कोणी विचारलं की या सणाचं महत्त्व काय किंवा हा शब्द कसा तयार झाला? तर आपली दातखीळ बसते. अशाप्रकारच्या लेखांमधून त्या शब्दाची उत्पत्ती, इतिहास, भुमिका या सर्व गोष्टी लक्षात येतात.

  5. rsanjay96

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती आहे. सांस्कृतिक गोष्टींंतून भाषा विकास यावर लेख योजावा. डॉ. संजय रत्नपारखी

  6. dabhay

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम।

  7. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    वा: छानच लेख! नवीन माहिती मिळाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen