हॉटेलवाल्यांचे थालीपीठ


वर्षानुवर्ष मी मराठी हॉटेलांमध्ये भाजणीचं थालीपीठ खात होतो. भरपूर लोणी असायचं जोडीला त्यामुळे जाणवायचं नाही पण घरच्या आणि हॉटेलच्या चवीत काहीतरी फरक होता निश्चित. काही दिवसांनी कळलं की हॉटेलात असतं ते तळलेलं आणि घरचं असतं ते थापलेलं, तव्यावर भाजलेलं.
        मला वाटायचं कोकणचे लोक तसे तेल conscious  म्हणजे काटकसरी  बरं का !! तुम्ही बघा कोकणातल्या माणसाने कांदे पोहे केलेल्या कढईच्या तळाशी किती तेल शिल्लक राहत ते...चुकून घासलेली कढई म्हणुन वापरायला घ्याल :-) त्यामुळे थालीपिठासाठी तेल न वापरता भाजायची पद्धत निघाली असावी.  पण जेव्हा मेतकूट चालू केलं तेंव्हा कळले की थालीपीठ तळून देणं हा हॉटेलवाल्यांचा काटकसरीचा भाग असतो.

त्याचं काय होतं की भाजण्यासाठी एक तवा सतत गरम ठेवावा लागतो.  म्हणजे त्याच्याखाली सतत गॅस लावून ठेवणं आलं  दिवसभरात थालीपीठ कमी आणि इतर पदार्थ जास्त असा Scene  असेल तर तसा तो तवा सतत गरम ठेवणं महाग पडतं. डोसे वाल्यांचं ठीक आहे  कारण त्यांच्याकडे येणारे ग्राहक mostly  डोसा, उत्तप्पा खायलाच येतात त्यामुळे उडप्याला असा तवा सतत गॅसवर ठेवणं परवडतं. पण मराठी हॉटेलला नाही. म्हणून मग मधला पर्याय निघाला. तळण्यासाठी कढई तेल असतंच, बटाटेवडे,  भजी त्यात तळले जात असतातच.  मग थालीपीठ पण त्यातच तळून द्यायचं.  हा शोध लावणाऱ्याला पण मानलाच पाहिजे त्यामुळे मराठी हॉटेलमध्ये थालीपीठ हा पदार्थ टिकून राहीला.
        आता मग आम्ही मेतकूट मध्ये काय केलं? थालीपीठ तर ठेवायचं  होतं भाजूनच. मग त्यासाठी तवा सतत गरम ठेवणं आलं. परत हे सगळं व्यावहारीक दृष्ट्या फायद्याचं ठरायला हवं म्हणजे मराठी हॉटेल चालवणं ही charity व्हायला नको.  मग पर्याय आता तव्यावरचे पदार्थ मेनूमध्ये वाढवणं.  ते कोणते? तर थालीपीठ, धिरडी, आंबोळी वगैरे. जास्त करून लोकांना भाजणीचं थालीपीठ माहित आहे. म्हणून आपण त्याच्याबरोबर उपासाचं थालीपीठ, भोपळ्याचं थालीपीठ देऊ लागलो. धिरड्यात तर अनंत प्रकार. भाजणीचं धिरडं, टोमॅटोचं धिरडं, एक नवीन प्रकार आणला केळ्याचं धिरडं. मेतकूट मधला हा लोकप्रिय item. आंबोळी तर होतीच.­ लहान मुलांच्यात ती पटकन रुळली. एवढे पदार्थ झाल्यावर तवा पण तप्त राहिला आणि लोकांना वेगवेगळे पदार्थ पण मिळाले. झालं कि नाही "Having  a (pan) cake and eating too."

*थालीपीठ/धिरड्याला इंग्रजीत जाताना pan cake बनून जावं लागतं. :-)



प्रतिक्रिया

  1. Asmita Phadke

      2 वर्षांपूर्वी

    Mastch lekh !!

  2. Jitendra Dorle

      3 वर्षांपूर्वी

    छानच लेख

  3. anagha vahalkar

      3 वर्षांपूर्वी

    Good Idea!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen