हाॅटेल व्यवसायाची abc म्हणजे हाॅटेलचा APC


                                         गेल्या आठवड्यात आपण माझ्या 'महाग की स्वस्त ' या लेखात पदार्थांची किंमत कशी ठरते ते बघितल. पण नुसत्या पदार्थांच्या किमतीवरून आपला त्या रेस्टॉरंट मध्ये किती खर्च होईल याचा अंदाज येत नाही. तो येण्यासाठी  रेस्टॉरंट बिझनेस मध्ये APC नावाचा कॉन्सेप्ट असतो. APC  म्हणजे Average Per cover किंवा मराठीत माणशी खर्च.. त्या रेस्टॉरंटमध्ये जर आपण गेलो तर माणशी आपलं बिल किती येणार याचा अंदाज. उदा. एखाद्या रेस्टॉरंटचा APC 500 रु. असला तर आपण 10 जणं तिथे जाणार असू तर आपलं बिल अंदाजे 5000 रु. येईल. अर्थात हा अंदाज असतो, आपण कोणते आणि किती पदार्थ मागवणार यावर आपलं बिल अवलंबून असतं. कोणत्याही हॉटेल चा APC हा तिथे कोणते पदार्थ serve केले जातात? त्यांची प्रती  डीश किंमत किती? तिथे जास्त नाश्ता सर्व्ह होतो की लंच, डिनर यावर अवलंबून असतो. एखादं स्टेशन समोरच रेस्टॉरंट जिथे खूप उठबस आहे, येणारे लोकं मुख्यतः चहा प्यायला, नाश्ता करायला, कोणालातरी भेटायला अशा कामानी येत असतील तर त्यांचा APC 100 रु. च्या खाली असतो. तेच आपण चांगल्या फाईन डाईन रेस्टॉरंट मध्ये गेलो तर नाश्त्यासाठी 500 रु. आणि लंच डिन्नरसाठी 1500 रु. पर्यंतही  तो असू शकतो. झोमॅटोवर पाहिलात तर कॉस्ट फॉर टु असं लिहिलेलं असतं. हाच तो APC.  यावरून तुम्ही आपण आज या रेस्टॉरंटला जायला हवं का ते ठरवू शकता. 

APC चा कॉन्सेप्ट जसा कस्टमर फ्रेंडली आहे, तसाच तो हॉटेलच्या मालकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. दिवसभरात झालेल्या सेल ला येऊन गेलेल्या माणसांच्या संख्येने भागलं कि APC म्हणजे माणशी सेल मिळतो. आता तुम्ही  म्हणाल याचा मालकाला काय फायदा? तर मालकाला हे समजतं कि लोक तुमच्याकडे काय म्हणून बघत आहेत? एक चहा नाश्ता विकणारे उपहारगृह कि जेवण देणारे लंचहोम की casual dinner restaurant की fine dine restaurant.?

आता उदाहरण घेऊया मेतकूटचं. मेतकूट मध्ये चहा, कॉफी, नाश्त्याचे भरपूर पदार्थ तसेच जेवणासाठी  a la cart सेवा उपलब्ध आहे. Generally मराठी हॉटेलांमध्ये एवढा मेनू नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे लोक चहा, नाश्ता, पोळी-भाजी अश्यासाठी येतात. पण मेतकूटकडे लोकांनी पहिल्या दिवसापासून casual dinner restaurant म्हणून बघितलं, कारण जेवणाचे उपलब्ध विविध पर्याय. त्यामुळे मेतकूटचा APC हा साधारण 225 रु. आहे. म्हणजे 10 जणांच्या कुटुंबाने भरपेट खाल्लं तर बिल साधारण 2 ते 2.5 हजाराच्या मध्ये येईल.आता कोण किती खाऊन जाईल सांगता येत नाही, त्यामुळे किती बिल होईल हे हि अनिश्चित. त्यामुळे काही रेस्टॉरंट्स बुफे किंवा थाळी पद्धतीचा अवलंब करतात. याद्वारे माणशी किंमत ठरलेली असते तेवढी मिळतेच. बुफे साधारण 500 रुपयांपर्यंत असतो तर अमर्याद थाळी 300 रुपयांपर्यंत मिळते . हे मी  generally  सांगतोय,  हाॅटेलच्या दर्जानुसार दर इकडेतिकडे होऊ शकतात. तर मग मंडळी आता चाळाच  लावून घ्या, पुढच्या वेळी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात कि त्याचा APC काढायचाच.   लेख आवडला असेल तर जरूर शेअर करा.



प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    Interesting series that gives a behind-the-scenes peek at the hotel business.

  2. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    हाँटेल बाबत हि नवीन माहीती मिळाली.येत्या काळात हाँटेल व्यवहाबद्दल बरेच नवीन नवीन वाचायला मिळेल,हि आशा आहे.धन्यवाद.

  3. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    हॉटेलच्या बाबतीत असा विचार कधी केलाच नव्हता

  4. dhananjay deshpande

      4 वर्षांपूर्वी

    छान माहिती मिळाली.धन्यवाद



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen