विंदांच्या शैलीत तंबीचा रिमिक्स

पुनश्च    तंबी दुराई    2019-04-11 06:00:33   

सब घोडे बारा टक्के- रीमिक्स

देशाची सूत्रे कोणी सांभाळावी याबाबत आपली आग्रही राजकीय मते असतात आणि आपण त्यानुसारच मतदान करतो. परंतु राजकीय विचार असणे, राजकीय मत असणे, याचा अर्थ देशात आकाराला आलेल्या सार्वत्रिक,सर्वपक्षीय राजकीय संस्कृतीला दुजोरा देणे नसते. ही विचारसरणी काळाच्या ओघात जन्माला आलेली आहे असे आपल्याला उगाचच वाटत असते. प्रत्यक्षात ती कायमच होती, अन्यथा विंदांनी १९५० च्या सुमारास ‘ सब घोडे बारा टक्के’ ही कविता केली नसती आणि ती एवढी वर्षे टिकली नसती. विंदांच्या जन्मदिनानिमित्त त्या  कवितेचे स्मरण आणि तिच्याबद्दचा आदर त्याच कवितेचा मुखडा उसना घेऊन आणि त्याच साच्यात करण्याचा हा प्रयत्न खास बहुविधच्या वाचकांसाठी-

तंबी दुराई

जितकी खोकी तितकी मते
जितकी झाडे तितकी भूते
कोणी मूळचा, कोणी आलेला
कोणी शुद्धीत, कोणी प्यालेला
कोणी ट्रोलर, कोणी झोलर
कोणी दाता, कोणी बेगर
देती बुक्के, खाती धक्के
सब घोडे बारा टक्के!

रोज रोज नव्या थापा
याला ठेचा, त्याला कापा
कोणी एजेड, कोणी यंगं
कोणी शेपूट, कोणी शिंगं
ते तरी काय करणार?
हे तरी काय करणार?
त्याच त्याच बटनावर
पुन्हा पुन्हा तेच बोट
तेच आरोप, तेच ठपके
सब घोडे बारा टक्के

इकडे मेव्हणा, तिकडे साळी
इकडे बाळ्या, तिकडे बाळी
ज्याची सत्ता, त्याला हप्ता
इकडे शर्मा, तिकडे गुप्ता
तीच पाठ, तोच मार
तोच सुरा, तीच धार
तेच पाणी, तेच हबके
सब घोडे बारा टक्के

सब घोडे, स्वार कमी
जखमा खूप, मार कमी
खोक्यावरचे झाकण तरी
उघडून दाखव, माझ्या हरी
कोणी तरी, खरे बोला
भले सांगून, हाणा टोला
भ्रमापेक्षा सत्य बरे
श्रमापेक्षा हाल बरे
कोणी गुडगुड्या, कोणी हुक्के
सब घोडे, बारा टक्के

-----तंब ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


तंबी दुराई , अवांतर , विडंबन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.