हिशेबी माणूस


 अंक : वसंत - १९६० - (आकाशवाणी, पुणे केंद्राच्या सहकार्याने)'

पुलं' ही दोनाक्षरी जादू पुढ्यात आली म्हटल्यावर प्रस्तावनेची काही गरज नसते... एकेकाळी  पुलंनी आकाशवाणीवर वाचलेला आणि वसंत मासिकाने १९६० साली प्रसिद्ध केलेला हा लेख वाचा...आणि आनंद घ्या!

**********

अरसिकाला कविस्य निवेदन करण्याचा प्रसंग माझ्या कपाळी लिहू नकोस असं कोण्या संस्कृत कवीनें परमेश्र्वराला त्रिवार बजावून ठेवले आहे. पण प्रत्येक गोष्ट जेथल्या तेथें ठेवण्याचे वेड असलेल्या माणसाकडून आपल्या व्यवस्थितपणाची निवेदने ऐकण्यापेक्षा ते काम किती तरी सुसह्य म्हणावे लागेल. फारा दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला कांही निरोप वगैरे सांगायचा होता. दारांत शिरतांनाच फाटकावर बोर्ड होता – ‘आंत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ मनांत विचार आला आंत येणाऱ्यानें जर विसरूं नये तर बाहेर जाणाऱ्यानें विसरले तर चालेल काय? मी न विसरतां बागेचे फाटक लावून घेतले. आंतल्या बाजूने बोर्ड होता ‘बाहेर जाणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरूं नये.’ ‘मनुष्यस्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे.’ मी मनांत म्हणालो, दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिकटविलेली होती. ‘घंटी एकदांच वाजवावी.’  माझ्या मित्राने घंटी एकदांच वाजविली. कांही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी ‘पायपुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा’ अशी कुठे पाटी आहे की काय हे पहात पाय पुसले. वास्तविक पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही; परंतु मला कुठेही टापटीपीचा वास आला की मी आपला त्या घरांत शिरतांना पायपुसण्याला पाय पुसून टाकतो. त्या बंगल्यांत शिरतांनाच ह्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगला अंदाज आला होता.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , वसंत
विनोद

प्रतिक्रिया

  1. Vinayak Dahotre

      2 वर्षांपूर्वी

    अप्रतिम पुलंच्या बद्दल काय बोलावे असा वल्ली होणे नाही

  2. Medha Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    मस्त लेख.

  3. Mrudula Karekar

      3 वर्षांपूर्वी

    फारच छान, खूप दिवसांनी वाचायला मिळाले

  4. Chandrakant Chandratre

      3 वर्षांपूर्वी

    वा! पुन:प्रत्ययाचा आनंद.. असा मी असामी मधील एक व्यक्तीचित्र या व्यक्तीरेखेवर बेतलेले आहे.

  5. Shriniwas Kalantri

      3 वर्षांपूर्वी

    पु.लं चे अनोखे लेखन

  6. Anantrao Mahajan

      3 वर्षांपूर्वी

    पून्हा पुन्हा वाचून आनंद देणारे लेख आहेत हे.

  7. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    मस्त, तजेलदार,

  8. Prathamesh Kale

      3 वर्षांपूर्वी

    वा! खुपच छान व नमुनेदार लेख.

  9. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    भन्नाट

  10. Meghashyam Battin

      3 वर्षांपूर्वी

    लॉग इन प्रत्येक वेळेस का?

  11. Mohan Ranade

      3 वर्षांपूर्वी

    पु.ल च्या लेखावर प्रतिक्रिया देणे अशक्य केवळ आनंद

  12. Aparna Ranade

      3 वर्षांपूर्वी

    पुलं ते पुलं,असे परखड कुणाला लिहायला जमणार

  13. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान

  14. atmaram-jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान

  15. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    नेहमीप्रमाणे छान . असले नमूने आजही आजूबाजूला असतात. फक्त त्यांना शोधण्याची नजर आपल्याकडे हवी. ही नजर , हा नजरिया पु-लं-नी आपल्याला दिला.

  16. kaustubhtamhankar

      5 वर्षांपूर्वी

    आज पर्यंत बरेच पुल वाचले होतो. हा लेख मात्र नजरेतून सुटला होता. अव्यवस्थित पणाचा परिणाम दुसरे काय!

  17. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    पु.ल. कधीही चालू जीवनातं अप्रिय गोष्ट केल्यावर जो मानसिक त्रास होतो तेव्हा हा लेख वाचावा

  18. Ratnakar

      5 वर्षांपूर्वी

    खुप छान जुन्या आठवणींना उजाळा,,,

  19. सुधन्वा कुलकर्णी

      5 वर्षांपूर्वी

    मूळ लेखात जसा होता तसाच आम्ही कायम ठेवलाय. मात्र हा शब्द बहुदा ' कवित्व ' असावा असे वाटते.

  20. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    पहिल्या ओळीत आलेला कविस्य हा शब्द बरोबर आहे का ?

  21. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    चला , सकाळची सुरुवात तर छान झाली . दि. ०२.०६.२०१९ इसवीसनाच्या दिवशी स्टँडर्ड टाइम ८.०२ वेळेस ही प्रतिक्रिया दिली ☺️☺️

  22. rsrajurkar

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम पु .ल .

  23. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    मस्त लेख! पुलंच्या सहजपणाचा पुनःप्रत्यय आला!!

  24. rakshedevendra

      5 वर्षांपूर्वी

    अरे एक चमत्कार झाला, प्रतिक्रिया दिली आणि पूर्ण लेख पदरात पडला, बहुविध मार्गाने एकदाचा लेख वाचायला देखील मिळाला. मंडळाचे स्वामी तुमची लीला, लिला वा लीळा (जे काही आहे ते) अगाध खरी. सोफ्टवेअर इंजिनिअर पण नास्तिक असलेला मी, भले भले थकले पण आस्तिक होऊ शकलो नाही, पण बहुविध मंडळाच्या या चमत्कारामुळे मी कदाचित आस्तिक होण्याचे मार्ग सुकर झाल्याचे पाहून माझे जन्मदाते सुखाने पावले खरे. मंडळाचे आभार.

  25. rakshedevendra

      5 वर्षांपूर्वी

    कोण म्हणतंय टक्का दिला हा खेळ खेळायचा असेल तर हे बहुविध चे login करून पहावे, लेख उघडावा तर please login असा मेसेज, login केलेले असो वा नसो, मग बहुविध च्या software programmer च्या हट्टासाठी पुनः पुन्हा login करावे तरी देखील login करा असा प्रेमाचा लकडा चालूच. हे कसे झाले की प्रिय पत्नीशी हितगुज करायला देखील प्रत्येक वेळेस लग्नपत्रिका आणि लग्नाचे सरकारी नोंदणीकृत सर्तिफिकेट दाखवा अशी अट लग्नाचा रौप्य महोत्सव घातला तरी चालूच. बहुविध च्या software programmer सारखा स्तितप्रज्ञ साक्षात विनोबांनी देखील पहिला नसल्याने आणि बहुविधचे मंडळ त्यास अखंड आभारी असल्याने खाविसाला मिळेना बायको नि हडळीला मिळेना नवरा अशी गत झाल्यासारखी वाटते खरे. एकाच गोष्टीवर सारखे सारखे तेच तेच बोलण्याने आलेला हा कोडगेपणा सरकारी खात्यास देखील लाजेसा होईल, ईतर वाचक म्हणतील काय याला पडले आहे, नाही झाले login तर गेले उडत बहुविध मंडळ असे म्हणावे हवे तर. पण मी असे म्हणत नाही म्हणजे लौकिक अर्थाने चुकत तर नाही ना, हे कृपया बहुविध मंडळ कृपा करून सांगेल काय?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen