जपानी माणूस जेव्हा मराठी बोलतो


पुणे तिथे ...... " पुण्यात यावेळी मतदान कमी का झालं ? " हा प्रश्न कानी पडला आणि मी चमकून वळून पाहिलं . कारण हा प्रश्न विचारला जाण्याची जागा होती ....चेन्नई . चेन्नई किंवा मद्रासला हिंदी सुद्धा कमी ऐकू येते ...तिथे चक्क मराठी .... आणि हा प्रश्न विचारणारा होता ...एक जपानी माणूस . होय ....जपानी . तो केवळ मराठीत प्रश्न विचारत होता इतकेच नाही ....तर त्याचे मराठी उच्चार सुद्धा अतिशय व्यवस्थित होते . होय ....जपानी माणूस . झालं असं .... मी गेले दोन दिवस ऑफीस टूर मुळे चेन्नईला आहे . आज सकाळी नाश्त्याच्या ( ब्रेकफास्ट ) वेळी माझ्या शेजारच्या टेबलावर ६ - ७ जणांचा एक ग्रूप बसला होता . त्यात काही जपानी व्यक्ति होत्या . ते सगळे एका वाहन - उद्योगाशी संबंधित कंपनीच्या विविध विभागातील , विविध शहरातील आधिकारी होते . त्यापैकी बहुतेकजण एकमेकांना प्रथमच भेटत असावेत . त्यामुळे परस्पर - परिचयाचा कार्यक्रम ( हा शब्द त्या जपानी आधिकाऱ्याने नंतर वापरला .) सुरु होता . त्यावेळी त्यातल्या एका आधिकाऱ्याने जेंव्हां स्वतःची ओळख करून देताना तो पुण्याचा आहे असे सांगितले तेंव्हा त्या जपानी आधिकाऱ्याने हा प्रश्न मस्त मराठीत विचारला ..." पुण्यात यावेळी इतके कमी मतदान का झाले ? " या त्यांच्या गप्पांच्या ओघात त्या जपानी आधिकाऱ्याने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांविषयी जी आणि जितकी माहीती सांगितली ती तर थक्क करणारी होती ....इतकी माहीती कदाचित ....कदाचित ...पुण्याच्या मतदारांनी सुद्धा स्वतःच्या उमेदवारांविषयी मिळवली नसेल . किंवा अशी आणि इतकी माहीती मिळवण्याची प्रक्रिया सुरु असल्याने मतदानाचे प्रमाण कमी राहिले असेल . त्यांच्या आपापसातील बोलण्यावरून मग लक्षात आलं की हा जपानी आधिकारी येत् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , अवांतर , चन्द्रशेखर टिळक , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. arush

    3 वर्षांपूर्वी

  म्हणजे पुण्याची किर्ती जपानलाही पोचली. पण या माणसाची डोळस हुशारी वाखाणण्यासारखी आहे

 2. psirane

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 3. [email protected]

    3 वर्षांपूर्वी

  छानच आहेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen