सोळा आणे!

पुनश्च    वि. स. खांडेकर    2019-06-26 06:00:56   

( अंक – विश्र्ववाणी, सप्टेंबर १९३४)

वि. स. उर्फ विष्णु सखाराम खांडेकर (११ जानेवारी १८९८ ते २ सप्टेंबर १९७६) यांची ओळख वाचकांना आहे ती मुख्यतः भावना, कर्तव्य, संस्कार, चांगले-वाईट यांच्या आवर्तनात सापडलेल्या भाबड्या व्यक्तिरेखा यांभोवती रचलेल्या कथा,कादंबऱ्या यांमुळे. ‘अमृतवेल’, ‘सोनेरी स्वप्नं’, ‘वेचलेली फुले’ अशा शीर्षकांमधूनही ते लक्षात येते. ‘ययाती’ ही कादंबरी हा त्यांच्या लोकप्रियतेचा कळस ठरला. खांडेकरांच्या लेखनातील विनोद मात्र या साहित्यामुळे झाकोळला गेला आमि झाकलेलाच राहिला. श्री.कृ. कोल्हटकरांनीही खांडेकरांचे काही लेख वाचल्यावर त्यांना अधिक विनोदी लेखन करण्याचा सल्ला दिला होता. प्रस्तुतचा लेख हा त्यांच्या विनोदी साहित्याचा आणि विनोदी प्रकृतीचा एक अप्रतिम मासला आहे. पोष्टाविषयी आजवर पुलंसह अनेक साहित्यिकांनी लिहिलेले आहे कारण एकेकाळी पोष्ट हा मध्यमवर्गीय भावविश्वाचा अत्यंत महत्वाचा कोपरा होता. खांडेकरांनीही या लेखाची सुरुवात पोष्टाच्या वर्णनानेच केली आहे, परंतु पुढे पुढे पोष्ट हे केवळ निमित्त म्हणून उरते आणि साहित्यिकांमधील बनचुकेपणावर ते फर्मास भाष्य करतात. म्हटलं तर ही कथा आहे आणि म्हटलं तर ललीत लेख. खांडेकर १९३८ पर्यंत शिरोड्याला होते तेंव्हा लिहिलेली ही कथा/लेख १९३४ साली ‘विश्ववाणी’च्या अंकात प्रसिदध झाली होती.

.......................

एखाद्या पाश्चात्य कवीने पोस्टाची पर्वताशी तुलना केली आहे की काय ते मला ठाऊक नाही. असल्यास माझ्यावर वाङ्मयचौर्याचा आळ येईल. पण चोरीचा आळ येईल म्हणून गणेशचतुर्थीच्या सुन्दर चंद्रकोरीकडे न पाहून कवीचे कसे चालेल? म्हाताऱ्या आजीबाईंनी हवे तर त्या चंद्राकडे पाहू नये. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , पुनश्च , वि. स. खांडेकर , विश्र्ववाणी
कथा

प्रतिक्रिया

  1. kaustubhtamhankar

      5 वर्षांपूर्वी

    त्याना बघायचा आनंद मला मिळाला आहे. ययाती तिथे जन्मत होती.

  2. kaustubhtamhankar

      5 वर्षांपूर्वी

    सारवट गाड्या फक्त इथेच पहायला मिळतात!- सारवट गाड्या म्हणजे काय? कृपया सांगावे.... वि.स.खांडेकर कोल्हापुरात राजारामपूरीत रहात असत. त्यांच्या घरी त्या

  3. arush

      5 वर्षांपूर्वी

    मस्त आहे

  4. Sunanda

      5 वर्षांपूर्वी

    झकास! सात आण्यांचे रुपये हा वाक्प्रयोग रुळायला हरकत नाही.

  5. shrikant

      5 वर्षांपूर्वी

    pl continue this web

  6. Shrikant

      5 वर्षांपूर्वी

    at present Punashcha



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen