अनुबंध: धर्म आणि संस्कृतींचे - परीक्षण


माणसाची ओळख कशामुळे असते? माणूस कोणत्या श्रद्धांवर जगत असतो? प्रत्येक व्यक्ती, समाज, देश यांना आपली स्वतःची विशिष्ट ओळख हवी असते. ती ओळख कशात असते? धर्म, संस्कृती, विचारसरणी, भाषा की आणखी काही? या अनेक पदरी गुंतागुंतीच्या विषयावर प्रतिभा रानडे यांनी लिहिलेलं पुस्तक अलीकडे वाचलं- ‘अनुबंध धर्मसंस्कृतींचे’. हे पुस्तक इंडस सोर्स बुक्स ने २०१७ मधेच प्रकाशित केले आहे. पण त्यामानाने त्याची चर्चा झाली नाही असं वाटतं. विशेषतः जगात अनेक देशात विविध कारणांनी होत असलेल्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक वाचणे इंटरेस्टिंग आहे. प्रतिभा रानडेंनी हे पुस्तक सहा प्रकरणात विभागले आहे, आणि त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत आणि इंडोनेशिया या देशांवर विस्तृत अशी चार प्रकरणे आहेत. अनेक दशके परकीयांचे आणि स्वकीयांचे आघात सोसून बदलेल्या अफगाणिस्तानची ओळख आज काय आहे? एकच इस्लाम धर्म त्या देशात असूनही कट्टरतेमुळे त्या देशाच्या संस्कृतीत झालेला बदल पूर्ण उध्वस्ततेकडे घेऊन गेला. म्हणजे धर्म आणि संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि धर्म जितका पोथीनिष्ठ होत जातो तितका तो निसर्गापासून दूर होत जातो का, आणि त्यामुळे सांस्कृतिक अधःपतन होते का हे प्रश्न आपल्याला वाचताना पडतात. पाकिस्तान तर स्वतःची ओळख वेगळी असलीच पाहिजे या अटीतटीला येऊन निर्माण झालेला देश. धर्माच्या नावाखाली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या नादात, जे जे म्हणून अखंड भारत असताना तिथल्या लोकांचे सांस्कृतिक रीतीरिवाज, भाषा होते त्याला नाकारत उर्दूची सक्ती, धार्मिक कट्टरता याला त्याने प्रोत्साहन दिले आणि देश आर्थिक, सामाजिक दृष्ट्या भारताच्या तुलनेत कितीतरी मागे राहिला. इथेही धर्म एक असूनही भाषा आणि सांस्कृतिक दमन झाल्यामुळ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , अवांतर , माधवी कुलकर्णी , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. ugaonkar

    2 वर्षांपूर्वी

  लेखिका प्रतिभाताई याचे व त्याच्या पतीचे पुस्तके वाचनात आली खूप माहितीपूर्ण असतात . हे पण वाचायला पाहिजे

 2. Reewa

    2 वर्षांपूर्वी

  धर्माचे अशा रितीने विवेचन करणारे हे पुस्तक अभ्यासूंसाठी नक्कीच मार्गदर्शन करणारे असणार...धन्यवाद!

 3. raginipant

    2 वर्षांपूर्वी

  रुपपरेषेवरून पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा झाली खूप छान

 4. rsrajurkar

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान पोस्ट . पुस्तका विषयी दिलेली महिती उत्तम .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen