गाणाऱ्याचे पोर : राघवेंद्र भीमसेन जोशी

पुनश्च    माधवी शहाडे    2019-06-26 19:00:00   

पंडितजींचं लहानपण , कलेसाठी घेतलेले कष्ट , गुरुंचा राग सहन करत केलेली संगीत साधना, मामेबहिणीशी झालेलं लग्न (सुनंदा कट्टी), आणि मग दोन मुलं झाल्यानंतर तिस-या मुलाच्या जन्मानंतर काहीच दिवसात पंडितजींनी शिष्येबरोबर (वत्सला मुधोळकर) केलेलं लग्न , मग काही दिवसांनंतर लपून छपून परत पहिल्या बायको-मुलांशी वाढवलेले संबंध, संसारात दुस-या बायकोचा आयुष्यभर वरचष्मा राहणं असे टप्पे आहेत. या सगळ्या घटनाक्रमामुळे पहिल्या कुटुंबातल्या मुलांच्या वाट्याला आलेली अवहेलना , अपमान , कुचंबणा, ओढग्रस्तीची परिस्थिती याचं चित्रण पुस्तकात आहे. निर्मितीचा क्षण पकडणं‌ अवघड ,थकवणारं , बेभान करणारं असतं. कलेचा ध्यास माणसाला बाकी जगापासून वेगळं पाडतो. कलासक्त माणसाला व्यावहारिक जगाची फुटपट्टी लावून मोजणं शक्य नसतं. पण तरी एकदा का कुटुंब तयार झालं की प्रापंचिक जबाबदा-या येतात आणि त्या पारही पाडाव्या लागतात. स्वत:च्या वडिलांची एक व्यक्ती , नवरा आणि बाप म्हणून चिकित्सा करणं खरं तर अवघड काम. त्या त्या वेळी जसे पटतील तसे निर्णय घेतले गेलेले असतात. पण अनुभवाने आपल्यापुरती काही मतं बनतात. ती लेखकाने मांडली आहेत. आईची परवड बघत लहानाचा मोठा होणं , पंडितजी मुलांच्या मुंजी ,लग्न , नातवंडांची बारशी अशा कार्यक्रमांना यायचे. तरीही या कुटुंबाचा कुठेही जाहीर उल्लेख न होणं, काहीही चूक नसताना‌ सतत अन्याय सोसावा लागणं यामुळे झालेली कडवट भावना कधीच दूर होत नाही. या माणसावर आपला पहिला हक्क , अधिकार असूनही त्याच्याकडून थोड्या का होईना प्रेमाची याचना या कुटुंबाला आयुष्यभर करत रहावी लागते. आपल्या हक्काचं दुस-याच्या वाट्याला जाण्याचं वैषम्य वाटत राहतं. दुस-यांच्या मेहरबानीवर जगावं लागतं. पैसाअडका, इस्टेट ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , पुस्तक परिचय , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. avinashjee

      2 वर्षांपूर्वी

    लेख छान !वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen