'दरी' वाढताना - अफगणिस्तानी परिवर्तन


जुन्या घराजवळ माझा एक नेहमीचा मासेवाला होता. कितीही वेळा खरेदी-विक्री झाली तरी त्याच्या चेहऱ्यावर ओळख दाखवणारी रेषही दिसायची नाही. मी हसून दोन वाक्य बोलले तरी चेहरा तसाच. मख्ख नव्हे, पण काहीसा थकून निर्विकार झालेला. काही महिन्यांनी त्याचा बारा-तेरा वर्षांचा मुलगा रविवारी गल्ल्यावर बसायला लागला. मासे स्वच्छ करून देता देता त्याच्या-माझ्या गप्पा व्हायला लागल्या. त्याचे बाबा नुसते बघत बसत. शाळा, हवा-पाणी, आवडते मासे असली आमची बडबड चालायची. ती ऐकून त्या बाबांच्या चेहऱ्यातही किंचित नरमाई यायला लागली होती. एक दिवस आमची गाडी भाषांकडे आली. वयाच्या तेराव्या वर्षी पाच भाषा येत होत्या त्या मुलाला. सुरमई-पापलेटचं दुकान आणि पाच-पाच भाषा! कसं देवाने सगळं वैभव एका छोट्या मुलाला देऊन टाकलंय या विचाराने हेवा वाटून खाक झाले होते मी. “कुठल्या भाषा रे? कशा काय शिकलास एवढ्या?” मी विचारलं, तसा त्याच्या बाबांचा चेहरा पुन्हा धीरगंभीर झाला. “द–” “जा रे, गिऱ्हाईक आहे दुसरं बाहेर.” तो पुढे बोलणार इतक्यात खवीस बापाने त्याला आत पाठवलं. आता असला गनिमी कावा काय मला समजणार नाही का? मीही भोचकपणा करायच्या मूडमध्ये आले आणि मासे बर्फाच्या पिशवीत ठेवून तिकडेच ठिय्या देऊन उभी राहिले. दोन गिऱ्हाइकं आटपली. मुलगा परत आत आला आणि मला तिथेच पाहून हसला. “सांगत होतास ना? सांग ना कुठल्या भाषा!” “Why you ask? What difference it make to your fish?” मुलाऐवजी बाप बोलला. “माझ्या माश्याला काय फरक पडणारे? काहीच नाही. आणि त्यात न सांगण्यासारखं काय आहे?” आम्ही दोघं हटून बसलो. तो मुलगा बिचारा टेनिस पाहिल्यासारखा एकदा माझ्याकडे नि एकदा बाबांकडे बघत उभा! “नक्की फरक नसेल पडत तर सांगतो भाषा.” बापाने पोराला मान हलव ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , अवांतर , अर्निका परांजपे , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. Sunanda

    2 वर्षांपूर्वी

  एक चांगला, नितळ लेख. लेखिकेचे आणि बहुविधचेही अभिनंदन.

 2. craje

    2 वर्षांपूर्वी

  व्वा! अत्युत्तम!

 3. rakshedevendra

    2 वर्षांपूर्वी

  फोटोचा उल्लेख आहे पण फोटो मात्र गैरहजर आहे. लेखिकेला "लेखक" दृष्टी आहे. निरीक्षण सूक्ष्म, संवेदनक्षम आणि साक्षेपी आहे. इतिहास आणि सद्यस्थितीचे लेखिकेला आलेले भान उल्लेखनियच नाही तर अभिनंदनीय देखील आहे. पाकी ही ब्रिटन मध्ये शिवी म्हणून वापरतात, नि पाकिस्तानी बहुल भागातील पाकी नागरिक देखील स्वतःला भारतीय म्हणून सांगतात हे माझा स्वानुभव सांगतो. रुमाली रोटी, नान, सब्जी हे शब्द गोऱ्या लोकांत प्रसिद्ध करणारे कराचीचे बल्लव मोक्याच्या ठिकाणी पंजाबी ठेले मांडून बसलेले असतात 'इंडिअन क्युझिन' या सदराखाली. बांगलादेशी वंशाचे नागरिक देखील 'इंडिअन क्युझिन' काढून बसतात पण पाककौशल्याच्या नावाने बोंब म्हणून त्यांचे उद्योग लपून मात्र रहात नाहीत. 'आयडेन्टीटी कॉम्प्लेक्स' मात्र सर्वांमध्ये आढळतो. या सगळ्यात श्रीलंकन आणि अफगाणी लोकांनी किराणा, भुसार नि फळे-भाजी दुकाने भरभरून उभारलेली. त्यांच्या मांडण्या थेट पदपथावर अर्ध्यावर आलेल्या आढळतात. सकाळी भल्या पहाटे उघडणारी ही दुकाने अथकपणे दुपारची वामकुक्षी देखील न घेता रात्री उशिरापर्यंत ग्राहकांसाठी उघडी असतात. हे सर्व आठवताना लेखिकेचे संवाद कौशल्य खरोखर उल्लेखनिय आहे हे ठासून जाणवले. अफगाण-भारत स्नेहबंध नि त्यातील नाजूक नाते हे देखील या लेखाद्वारे उलघडत जाते हे देखील या लेखाचे विशेषत्व खास. लेखिका व संपादक मंडळाचे विशेष आभार.

 4. ddj60

    2 वर्षांपूर्वी

  वेगळ्या अंगाने अफगाणिस्तान फार विलोभनीय पद्धतीने वाचकांसमोर मांडला आहे! खूप छान!

 5. purnanand

    2 वर्षांपूर्वी

  छान लेख! वाचताना प्रतिभा रानडे यांच्या ' काबूल कहंदार च्या कथा ' वाचतोय असाच भास होत होता

 6. bookworm

    2 वर्षांपूर्वी

  अप्रतिम! मनाच्या एका कोपर्यात काबूलीवाल्याबरोबर या लेखाने जागा पटकावली. लिखाण विलक्षण जेन्युईन वाटले व म्हणून मनाला भिडलं.

 7. ajaywadke

    2 वर्षांपूर्वी

  छान लेख आहे. अफगाणिस्तानबद्दल फारच कुठे वाचायला मिळतच नाही. 'काबुली जबाब' मस्तच..

 8. VinitaYG

    2 वर्षांपूर्वी

  Khup chhan... manapasun lihilela anni titkach manapasun aawadlela lekh? Hats off to Afganistan??

 9. arush

    2 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख. स्वाभिमानाने जगण्यातला आनंद शिकवणारावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen