Zugunruhe... एक घरवापसी


किंग सामन मासा युकोन नदीवर झुकलेल्या ढगात जन्मतो, अगदी, अगदी उगमापाशी. तिथे त्याची आई खळखळ वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला घरट्यासारखे खळगे करते. यात पाणी पाळण्यासारखे सावकाश हलते. छोटे सामन या pebbles च्या घरट्यातून पहिल्यांदा नदी बघतात. आणि मग कुठल्या दूर समुद्राची हाक त्यांना ऐकू येते की ढगातले आपले घर सोडून सगळे खळखळ-नदीतून मोठ्या नदीत, मोठ्या नदीतून विस्तीर्ण खाडीत आणि खाडीतून पार, पार खाऱ्या समुद्रात जातात. कुठे जातात, तिथे काय खातात, गोड्या पाण्यातले जीव इतक्या खाऱ्या पाण्यात कसे जगतात हे आपल्याला काही माहित नाही. पण खरी किमया होते ती नंतर. जेव्हा या खलाशी सामन माशांना अंडी घालायची असतात तेव्हा मात्र समुद्रातल्या लाखो, करोडो लिटर खाऱ्या पाण्यातून ते आपल्या जन्म नदीचा एक थेंब ओळखतात आणि एक अशक्य प्रवास सुरु करतात. किंग सामान मासा ३,२०० किमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून समुद्रातून आपल्या नदीत परत येतो. परत त्याच ठिकाणी जिथे त्याचा जन्म झाला. गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात आणि परत गोड्या पाण्यात. डोंगरात पोहोचेपर्यंत माशाच्या खवल्यावरची चंदेरी चमक विरते, खाणे पूर्ण बंद होते, शेपटीचा झोक केविलवाणा होतो, नजरेतील आग विझू लागते. पण आपल्या घरी पोहचेपर्यंत मासा इथे तिथे बघत नाही आणि तिथे अंडी देऊन, त्यांना त्यांच्या सावकाश झुलणाऱ्या पाण्याच्या घरट्यात ठेवल्यावर तो आकाशाकडे डोळे करून पाण्यावर शांतपणे तरंगतो. पाण्यात बुडतो. यांचे सगळेच विलक्षण. पण सगळ्यात विलक्षण म्हणजे यांना घर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , सोशल मिडीया , पर्यावरण

प्रतिक्रिया

 1. Prakash Hirlekar

    2 वर्षांपूर्वी

  छान. मुळाची ओढ जेनेटिकली टिकून राहणे हे मनुष्या व्यतिरिक्त इतर काही प्राण्यात दिसते.तसे लेखही वाचल्याचे आठवते.

 2. ugaonkar

    2 वर्षांपूर्वी

  एकूण लेख जरी गमतीचा वाटलं तरी मारुतीची इतकी मोडतोड का?

 3. ajitpatankar

    2 वर्षांपूर्वी

  वाह !! खूप छान !!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen