कोंकणी म्हणी

पुनश्च    कमला वाघ    2019-08-16 10:00:27   

अंक – अमृत, जानेवारी १९६५ त्रिवेणीच्या लग्नासाठी पापडांचा घाट घातला होता. आजूबाजूच्या बायका पापड लाटण्यासाठी जमल्या होत्या. गप्पागगोष्टींच्या रंगांत पटापट पापड लाटून होत होते. लाटलेल्या पापडांच्या चळती उचलून मुले अंगणांत नेऊन ते पापड वाळत टाकत होती. कामिनी मात्र उगीच इकडून तिकडे येरझारा घालीत, ‘अग बयु, पापडांची पिठी कुटायला लवकर ये. अग गजऱ्या, लाटून झालेले पापड उन्हांत वाळत टाक,’ असे हुकूम सोडत उगाचच आरडाओरडा करीत होती. ते पाहून जाई म्हणाली, ‘ह्या कामूचा उगाचच आरडाओरडा चालला आहे. एक कांही पापड लाटून झाला नाही अजून हिच्या हातून. गाजावाज मात्र किती करते बघा.’ पापडांच्या पिठीच्या गोळ्या विळीवर कापीत बसलेली आजी जाईकडे बघून हसून म्हणाली, 'जायू, अग तसंच असायला हवं माणसानं., ‘नडणी कशीय आसूं, कण्णो बरॉ हालता मूं!’ नडणी कशी का होईना! इरले (कण्णो) चांगले झकास हालते आहे ना! मग झालं तर!' शेतांत भाताची रोपे रुजून आल्यावर त्यांच्याबरोबर रुजलेले गवत वगैरे उपटून टाकायचे असते. त्याला ‘नडणी’ म्हणतात. हे गवत उपटून टाकणाऱ्या बायका पावसांत डोक्यावर इरली घघेऊन हे काम करतात. गवत उपटतांना होणाऱ्या हालचालीने त्यांच्या डोक्यावरची इरली हालतात. एक बाई होती कामचुकार. ती नडणी न करतां फक्त गप्पागोष्टीच करीत होती व उगीचच डोक्यावरचे इरले हलवीत होती. तिचे जोरजोरांत हलणार इरले पाहून लोकांना वाटत होतें, की बाई झपाझप नडणी करते आहे. बाबुसो कुंभार म्हणजे सदा गरजू माणूस. नेहमी यायचा आणि काकांकडून पांचदहा रुपये उसने घेऊन जायचा आणि परत करतो म्हणून सांगितल्या दिवशी कधीच परत करायचा नाही. अशाच एकदा, दिवाळीच्या आधी येऊन तो काकांकडे पंचवीस रुपये मागूं लागला. तेव्हा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीर्घा , भाषा , अमृत

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    अतिशय छान!

  2. ab

      5 वर्षांपूर्वी

    .मस्तच

  3.   5 वर्षांपूर्वी

    Great



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen