प्रवास कसा करावा?

पुनश्च    ना. सी. फडके    2019-08-24 06:00:38   

अंक – रंजन, दिवाळी अंक १९६० 

ना. सि. फडके ( ४ ऑगस्ट १८९४-२२ ऑक्टोबर १९७८) हे आपल्याला कादंबरीकार, कथाकार म्हणून चांगलेच परिचित आहेत. मात्र लघुनिबंध किंवा गुजगोष्ट या प्रकाराचेही ते आद्य प्रवर्तक आहेत. प्रसन्न खेळकर शैली हे त्यांच्या निबंधाचे वैशिष्ट्य. केल्याने देशाटन...हे आपल्याला माहिती आहेच, परंतु देशाटन करताना म्हणजे वेगवेगळ्या मुलखांत गेल्यावर तो मुलुख कसा पहावा, तेथली माणसे कशी ‘वाचावी’ याविषयी प्रत्येकाचे काही वेगळे ठोकताळे असतात. फडक्यांनीही स्वतःची अशी एक पद्धत विकसित केली होती. ते केरळला गेले असताना त्यांनी त्यांच्या या खास पद्धतीने केलेले केरळचे, तेथील समाजाचे आणि परिस्थितीचे हे अवलोकन खूपच रसदार आणि मनोरंजक आहे. हा लेख १९६० साली रंजन या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला होता.

********

प्रवास कसा करावा याचं एक विशिष्ट तंत्र मी अनुभवानं ठरविलेलं आहे. या तंत्रानं वागलं की प्रवासाची खरी मजा भरपूर मिळते आणि मनोरंजनाबरोबरच बोधाचाही लाभ होतो.... दूरच्या अपरिचित मुलखांतल्या प्रवासाला मी गेलो की तिकडली निसर्गरचना, तिकडे आढळणारे पशुपक्षी, यांच्याकडे ज्याप्रमाणे मी अधाशीपणानं पाहूं लागतो त्याप्रमाणेच मी दुसरी एक गोष्ट करतो. कोणती ते सांगतो. .. ..! तिकडची मिळतील तेवढी वर्तमानपत्रं मी विकत घेतो आणि त्यांतली मुख्य महत्त्वाची पानं वाचीत नाही तर जो मजकूर एरवी वाचण्याची तसदी वाचक घेणार नाहीत तो मजकूर मी अगदी बारकाईनं नजरेखालून घालतो. तो वाचल्यानं माझं नुसतं मनोरंजनच होत नाही तर कितीतरी विविध प्रकारचा बोध मला मिळतो. एकदां त्रिवेंद्रम येथे भरलेल्या ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’ला हजर राहण्यासाठी म्हणून मी निघालो. या प्रांतातला हा माझा पहिलाच प्रवास होता. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , अनुभव कथन , रंजन , स्थल विशेष
स्थल विशेष

प्रतिक्रिया

 1. Harihar sarang

    2 महिन्यांपूर्वी

  दूषनिय, नव्हे वेगळे। हा दृष्टिकोन अत्यंत उपयुक्त आहे। आजच्या काळात तर आवश्यक। भिन्न संस्कृतीला समजावून घेण्याची पूर्वावश्यकता।

 2. Medha Vaidya

    2 महिन्यांपूर्वी

  खूपच मस्त आहे लेख। असा पेपर वाचायचा विचारच कधी डोक्यात आला नव्हता!

 3. Hemant Marathe

    2 महिन्यांपूर्वी

  प्रवासाचे उत्तम तंत्र लेखकाने मांडले आहे.

 4. Mukund Deshpande

    2 महिन्यांपूर्वी

  फारच मस्त

 5. atmaram jagdale

    2 महिन्यांपूर्वी

  छान उपाय सांगितला आहे .

 6. Jayashree patankar

    2 महिन्यांपूर्वी

  मस्त. यासाठीच लेखकाची दृष्टि हवी.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen