मराठी नियतकालिकांचा इतिहास ४

पुनश्च    संकलन    2017-09-28 11:40:46   

मराठी वाङ्मयाच्या आणि विशेषतः मराठी नियतकालिकांच्या इतिहासात १८७४ हे साल अत्यंत क्रांतिकारक समजले पाहिजे. यापूर्वी थोडे दिवस महाराष्ट्रात जुन्या-नव्यांची अगर उद्धारक-सुधारकांची मोठी खडाजंगी माजून राहिली होती. १८४८ पासून लोकहीतवादींनी  'प्रभाकर', 'इंदुप्रकाश', 'वृत्तवैभव', 'ज्ञानप्रकाश' वगैरे पत्रातून आपली लेखणी चालवून महाराष्ट्रात पसरलेल्या अज्ञानांधःकाराविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आणि अर्धवट गुंगीत असलेल्या महाराष्ट्रीयांस जागे केले. एका बाजूला लोकहितवादी, न्या. रानडे, विष्णू परशराम पंडित यांच्यासारखी नव्याची अभिमानी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला जुन्याच्या अभिमान्यात विठोबा अप्पा दफ्तरदार, गजेंद्रगडकर यांच्यासारखे सनातनधर्माभिमानी गृहस्थ होते. विधवा-पुनर्विवाह शास्त्रसिद्ध की अशास्त्र यावर श्रीशंकराचार्यांच्यासमोर यावेळी अटीतटीचा सामना झाला. याचवेळी हिंदू धर्मावर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे जोराचे व पद्धतशीर हल्ले वर्तमानपत्रांतून, धार्मिक सभांतून आणि जाहीर सभांमधून होऊ लागले. अशाप्रकारे महाराष्ट्र नवविचारांच्या जोरदार झंझावाताने दोलायमान होऊन स्तिमित झाला असता निबंधमालाकारांनी आपल्या नवचैतन्यपूर्ण, रंगदार व चित्रविचित्र उपमालंकारातीशयोक्तीपूर्ण आणि चटकदार अशा भाषेच्या सहाय्याने महाराष्ट्रात विचारक्रांती घडवून आणली. - संकलन  स्रोत - साभार: मराठी नियतकालिकांचा इतिहास (१८३२-१९३७)- रामचंद्र गोविंद कानडे Google Key Words - Lokhitwadi, Prabhakar, Induprakash, Vrutta Vaibhav, Marathi Periodicals, History Marathi Periodicals. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , मराठी नियतकालिकांचा इतिहास , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen