श्रवणीय झलक – पान लागलं तेव्हा !!

विषारी सापांशी झालेल्या सामन्याची राजन शिर्के यांची ही चित्तथरारक गोष्ट श्रवणीय आहे !!

पान लागलं तेव्हा !!

आणि इथून पुढे सरकणारा प्रत्येक क्षण माझ्या आणि इतर संबंधितांच्या कसोटीचा ठरला. पुढचे काही क्षणच फक्त रिकामे आणि दिशाहीन गेले. नंतरची जाणीव जोरात लघवी लागल्याची होती. संडासाची जागा माहित होती. उठण्याचा प्रयत्नही केला. पण वळता येईना. जणू शरीराला टनाचे ओझे बांधले होते. नागदंश बरेच बघितले होते, वाचलेही भरपूर होते. आज स्वतःच अनुभवत होतो. आता हृदय प्रचंड धडधडत होते. श्वास घेण्यास खूप त्रास होत होता, घसा दुखत होता. पापण्या खूप जड वाटत होत्या. झोपून टाकावेसे वाटत होते. विवेक पलंगाजवळ आला व काहीतरी विचारायला लागला; पण मी काय सांगितले, हे त्याला कळले नाही. कारण माझे शब्द लाळेत लोळत आडव्या जिभेने बाहेर रेटले होते. क्षणार्धात त्याला धोक्याची जाणीव झाली व तो जोरात ओरडला, “सिस्टर, सिस्टर पेशंट अनकॉन्शस होतोय”

झलक ऐकण्यासाठी क्लिक करा येथे!

पूर्ण कथा ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या – येथे क्लिक करा. !!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. ghanshyampawar11@gmail.com

    श्रवणीय सभासद नोंद करणेस ईच्छुक आहे.

    1. किरण भिडे

      आपण वेगळे श्रवणीय चे सभासदत्व देत नाही. त्याऐवजी पुनश्च मध्ये दर महिन्याला दोन लेख ऑडीओ स्वरुपात सुद्धा देतो. आपल्याला ऐकायला मिळालं ना?

Leave a Reply