झोले में उसके पास..- दै. लोकसत्ता


निवडक अग्रलेख - दिनांक १६ ऑगस्ट २०१९ आजच्या प्रहारच्या अग्रलेखाचं शीर्षक आहे ' आधी पुनर्वसन, मग राजकारण ' आणि त्याला साजेसे डोस सर्व पक्षांना पाजले आहेत. राजकीय नेत्यांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा करण्याऐवजी स्वतः एक एक पूरग्रस्त गाव दत्तक घेऊन त्याचं पुनर्वसन का करू नये? असा सवाल यात व्यक्त केलाय. सामनातला अग्रलेख मोदींच्या कालच्या भाषणावर आहे. आणि त्यात केलेली मोदींची भलामण पाहता, हाच तो भाजपविरोधी घणाघात करणारा सामना आहे यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. वृत्तपत्रे आणि त्यांच्या अग्रलेखांवर पडणारे राजकारणाचे पडसाद मोठे रंजक असतात. कालच्या भाषणाचे विश्लेषण करणारा लोकमतचा अग्रलेखही चांगला झाला आहे. मटाच्या अग्रलेखातलं एक वाक्य अतिशय आवडलं " मोदी सरकार तज्ज्ञाकडे परराष्ट्र खाते सोपवू शकते, एकच लष्करप्रमुख नेमू शकते, ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते, तर अर्थकारणाची सूत्रे या विषयातील 'कटू पण पथ्यकर' वागणाऱ्या तज्ज्ञाकडे का सोपवत नाही? " ..... माझ्या मनातही हा भावनिक विचार अनेकदा येऊन गेला आहे की धाडसी निर्णय घेणाऱ्या मोदींनी, देशाच्या भल्यासाठी थेट मनमोहन सिंगांना अर्थमंत्री म्हणून का नेमू नये ? पण राजकारण आपल्यासारख्या भावनाप्रधान माणसांवर चालत नसते. असो. परवा १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचाही स्वातंत्रदिन होत्या. आपल्या बरोबरचं जन्म झालेल्या या देशाची झोळी ७२ वर्षांनी सुद्धा रिकामी का राहिली यामागील कारणांचा उहापोह करणारा लोकसत्ताचा अग्रलेख अप्रतिम आहे. तोच आजचा निवडक अग्रलेख म्हणून निवडला आहे. निम्म्याहून अधिक पेपर्सना काल स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने आज निवडीत स्पर्धा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , लोकसत्ता , निवडक अग्रलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    एकत्र स्वातंत्र्य मिळाल्यामुळे दोघांची तुलना होणे अपरिहार्य आहे. पण विस्ताराने आपण मोठे असल्यामुळे तो फायदा आपणास झाला हे खरे. पण अग्रलेख पाकिस्तानचे वैचारिक खुजेपण नेमकेपणाने दाखवतो.

  2. Udaybhise

      5 वर्षांपूर्वी

    ? खरच असे लेख वाचताना आपल्या देशाबद्दल सार्थ अभिमान वाटतो असे लेख येत राहिल्यास हे सदर सुपरहिट होईल



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen