गणपती आले...


गावात ठराविक दुकानं ही नेहमीच भाड्याने दिलेली असायची. तिथे एक धंदा कधी चालायचाच नाही. दिवाळीत फटाके, आकाशकंदील असायचे, ते संपले की कोकणातून येणारे आंबे, फणस मांडले जायचे.पावसाची झड सुरू झाली की आंबे आवरले जायचे आणि त्याच दुकानांत राख्या मांडल्या जायच्या. एखाद्या दुकानात मात्र लोखंडी मांडण्या लागायच्या. मग रात्री अवचित शे दीडशे पांढऱ्या मूर्ती कुठूनतरी यायच्या. लहान मोठ्या आकाराच्या ह्या मूर्ती जपून प्लॅस्टिकने झाकल्या जायच्या. त्यांना पूर्ण रंग दिलेले नसायचे. दुसऱ्या दिवसापासून ते उरलेले रंगकाम शटर उघडं ठेवून सुरू व्हायचे. गणपती आले, आम्ही म्हणायचो.. आषाढधारांनी कोसळणारा पाऊस वातावरणात रुतून बसलेला असायचा. सगळ्या आसमंतात तो राखी करडेपणा साचलेला असायचा. रस्त्यावरची माती आणि डांबर वाहून गेलेलं असायचं. स्लीपरने उडणारा चिखल पाठीवर रांगोळी काढायचा. ओलसर गार कपड्याने शाळेत जायचं जीवावर आलेलं असायचं. वाहत्या साचल्या पाण्याचे, शेवाळाचे, स्टाफरूम मधल्या उकळत्या चहाचे वास वर्गात फिरत राहायचे. जीव जड झालेला असायचा. आणि मग एक दिवस गटारी यायची. दर्दी लोक खास सुट्टी काढायचे. मटणाच्या दुकानापुढे रांग लागायची. आदल्या रात्री कळपाने आलेल्या शेळ्याही दुकानामागे रांगेत बांधलेल्या असायच्या. घरोघरी मसाल्यांचे गंध रेंगाळायचे. खाऊन पिऊन तुस्त झालेली माणसं पोटातले सुख डोळ्यावर ओढून झोपी जायची. आखाड संपलेला असायचा. हासत नाचत श्रावण यायचा. नागपंचमी यायची, नाग घेऊन गारुडी फिरायचे. नागाचे दात काढलेत की गारुड्याचा मंत्र पॉवरफुल आहे ह्याचे वाद रंगायचे.उन्हापावसाचा खेळ सुरू व्हायचा. उन्हात पाऊस पडायला लागला की "नागडा पाऊस, नागडा पाऊस" असं ओरडत आम्ही हातावर थेंब घ्यायचो. श्रावणी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , प्रासंगिक , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

  1. bookworm

      2 वर्षांपूर्वी

    छान तपशील...विसर्जनाची गम्मत पण अनुभवायची होती.......असाच लेख पुढे चालू राहावा असं वाटलं.

  2. ajaygodbole

      2 वर्षांपूर्वी

    सुंदर.त्या काळात गेल्या सारखे वाटलेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen