रा. भि. जोशी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक संयत प्रवृत्तीचे लेखक. शैलीचे अवडंबर नाही आणि आक्रमकतेचा लवलेश नाही. आस्वादक असा एक शांतरस त्यांच्या सर्व लेखनातून पाझरत राहतो. प्रवासवर्णनांना त्यांनी ललित साहित्याचे स्थान प्राप्त करुन दिले हे त्यांचे मोठे कर्तृत्व. जोशी मूळचे विदर्भातील. ते विद्यार्थी असताना १९२०च्या सुमारास व्ही जे टी आय च्या परीक्षेसाठी मुंबईत आले होते. त्या पोरसवदा वयात त्यांनी विदर्भाच्या नजरेला झालेले मुंबईचे पहिले दर्शन ज्या प्रकारे टिपले होते, त्यावरुन त्यांच्या नकळत एक लेखक त्यांच्यात जन्माला आला होता, ले लक्षात येते. साठ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना मुंबईने आणि एकूणच मराठी समाजाने एकमेकांबद्दलचा आपलेपणा, मदत करण्याची वृत्ती आणि निरागसता गमावलेली आहे असे वाटून थोडे उदासही वाटायला होते. या लेखात तेंव्हाची मुंबई दिसते आणि तेंव्हाचा समाजही. ********** अंक – जनवाणी दीपावली विशेषांक १९६० मी मुंबईला जातो! मुंबईचा माझ्या मनावर ठसा राहिला तो तिथल्या अंधाराचा, तिथल्या दमटपणाचा.... ट्रामगाड्यांच्या खडखडाटाचा.... मुंबईला पुन्हा यावे असे काही वाटले नाही.... कायमचे तर नाहीच नाही. मी कधी काळी मुंबईला जाईन असे मला केव्हांच वाटले नव्हते. लहानपणी हैद्राबादला असतांना भविष्य सांगणाऱ्या एका गृहस्थाने माझ्या तोंडाकडे पाहून भाकित केले होते की, “हा मुलगा सोळा-सतराव्या वर्षी मुंबईला जाईल” ते त्याचे भाकित मी विसरलो नव्हतो. पण मी त्याला महत्त्वही दिले नव्हते. मी मुंबईला कशाला जाणार? आणि मला मुंबईला कोण पाठवणार? पण त्याचे ते भाकित माझ्या वयाच्या सतराव्या वर्षी खरे होत होते. मी मुंबईला चाललो होतो. मी मुंबईला चाललो हो ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, समाजकारण
, अनुभव कथन
, जनवाणी
, स्थल विशेष
Rajendra Daga
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख सहज सुंदर आधी विजेटीआय भायखला येथे होते ते ऐकले होते आता माटुंगा येथे तेथून मि पदवी घेतली
ajitpatankar
5 वर्षांपूर्वीsorry.. १९६३ साल नव्हे १८६३ सालची मुंबई..
ajitpatankar
5 वर्षांपूर्वी"मुंबईचे वर्णन"... यात १९६३ सालच्या मुंबईचे वर्णन आहे......
asmitaphadke
5 वर्षांपूर्वीछान लेख. यांची इतर पुस्तके कोणती आहेत ?
[email protected]
5 वर्षांपूर्वीगोविंद नारायण मांडगावकर याचे कोणते पुस्तकं याच विषयावर आहे ते कळवा plz
ArunBhandare
6 वर्षांपूर्वीरा.भिंच्या वाटचाल,मजल दरमजल,अथवा,या संग्रहांची आठवण झाली.
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीगोविंद नारायण माडगावकर यांचे अतिशय सुंदर पुस्तक ह्याच विषयावर आहे