fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

एकाच नाण्याच्या दोन बाजू

आपण सकाळी धावत पळत कॉलेजला पोचतो. लक्षातच नसतं आज शिक्षक दिन वगैरे आहे. अर्ध्या वाटेत पावसाने गाठलेलं असतं. आधीच उशीर त्यात पाऊस असं चरफडत आपण गाडी साईडला घेतो. डिकीतून रेनकोट काढून अंगावर चढवतो. तोपर्यंत बरंचसं भिजलेलं असतोच. तसंच कॉलेजमध्ये पोचतो. बाहेर हवा कुंदच असते. आपण लॅपटॉप लावतो. लॉग इन करतो. लेक्चरच्या नोट्स काढायला घेतो. एकंदर दिवसाचं मीटर चालू होतं

दुपारी मुलं बोलवायला येतात. सगळ्या शिक्षकांना खाली हॉलमध्ये एकत्र जमायचं आमंत्रण असतं. मग छान छोटासा एक कार्यक्रम होतो. एखाद दुसरे गेम्स टीचर्सना पण खेळायला लावले जातात.आदबशीर मस्करी केली जाते. मित्रत्वाचं नातं असतं पण गळ्यात हात टाकण्याची आगाऊ धिटाई नसते. सगळा कार्यक्रम लाघवी असतो. मग रीतसर एखाद दुसरी शिक्षक किती छान अशी कविता सादर होते. केक कापला जातो. वेफर्स,केक, समोसा अशी एक डिश सर्व्ह होते. एकूणच सगळ्या कार्यक्रमाचा जीव तासाभरापेक्षा जास्त नसतो. पण त्यामागची मनापासून घेतलेली मेहनत जाणवते.

आवर्जून एखादा विद्यार्थी आजही बॅच तर्फे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असा मेसेज पाठवतो. त्यातले जवळपास सगळेच विद्यार्थी कुठे ना कुठे विखुरलेले असतात. देशापरदेशात स्थायिक झालेले असतात.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 4 Comments

  1. Lekh pharach avadla.

  2. Chhan

  3. उत्तम लेख ??

  4. मस्त

Leave a Reply

Close Menu