भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ६

पुनश्च    रोहन नामजोशी    2019-09-14 09:30:49   

प्रश्नपत्रिका *** दांडेकर आणि इनामदार घराण्यातील गौरी आणि गणपती काल शिरले. यावर्षीचा गणपती इतरांसाठी नेहमीसारखाच असला तरी शार्दूल आणि ओवीसाठी तो विशेष होता. खरंतर या सात दिवसात गणपतीसमोर जे काही विशेष 'दिवे लावले होते')ते फक्त त्या दोघांनाच माहिती होते. पण या दोघांनी या सात दिवसात फक्त भविष्याचा अंदाज घेतला. हा अंदाज कसा आणि किती आला हाही खरा एक प्रश्नच होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे दांडेकर अगदी पाकात मुरलेल्या चिरोट्यांसारखे पुणेकर होते. त्याचा त्यांना' जाज्वल्य अभिमान' होता. बाहेरून पुण्यात आलेल्या सगळ्या लोकांनी पुणं सडवलं या सार्वत्रिक समजात यांचाही होकार होताच. पुण्याच्या परंपरा, चालीरीती, स्थळं याबद्दल दांडेकर भरभरून बोलत असत. पांढरी टीशर्ट आणि हाफ पँट घालून टेनिस खेळायला जाणं आणि मग श्रमपरिहाराला रुपालीत जाऊन हाणणं हा दांडेकर काकांचा रविवारचा ठरलेला दिनक्रम होता. एक गणपती सोडला तर चौकोनी कुटुंबात रमण्यात दांडेकरांना धन्यता वाटायची. ओवीची आईसुद्धा पुण्यातल्या श्रीमंत बायकांच्या मांदियाळीतली होती. एनजीओचं काम, सोनेरी फ्रेमचा चष्मा घालून पुण्यातल्या सामाजिक परिस्थितीवर कोरेगाव पार्कात जाऊन चर्चा करणं असा तिच्या आईचा थाट होता. त्यामुळेच कदाचित ओवीवर समाजशास्त्राचे संस्कार झाले असं शार्दूल तिला गंमतीने म्हणायचा. त्याउलट इनामदारांचा कारभार म्हणजे अतिशय अघळपघळ होता. महात्मा सोसायटीत टुमदार घर, घरात कायम पै पाहुण्यांचा वावर, सातारा, कोल्हापूरहून अनेक ओळखीपाळखीचे लोक येणं हे सगळं शार्दूल लहानपणापासून पहात होता. पण हे सगळं पुढे जाऊन आपल्याला झेपेल का याबद्दल त्याच्या मनात अनेक शंका होत्या. पुणेकरांची चेष्टा हाही त्याच्या काळजीचा विषय होता ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , कथा , सोशल मिडीया

प्रतिक्रिया

 1. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  छान !

 2. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  शेवट खूपच मस्त! मनाला भावला

 3. schoudha

    2 वर्षांपूर्वी

  Excellentवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen