वृक्षवल्लींचे 'लैंगिक' व्यवहार


वंशसातत्य टिकलं पाहिजे म्हणून लैंगिकतेचं वरदान निसर्गानं मानवाला दिलं.  लैंगिकतेच्या या सोहळ्याचं माणूस किती कौतुक करतो. परंतु वनस्पतींचं 'वंशसातत्य' टिकावं म्हणूनन निसर्गानं कल्पकतेचा जो पसारा मांडला आहे तो कसा थक्क करतो ते पाहिलं का कधी? झाडांमध्येही पक्षीप्राण्याप्रमाणे ‘नर’ अधिक नटूनथटून येतो. ‘बकेट आर्किड’ चा मध मादक असतो. मधमाशी तो मध  प्यायली की झिंगून त्या फुलांच्या बादलीत पडते. त्या मदमस्त माशीमुळे फुलांचे पुंकेसर पिळवटून निघतात, त्यातली पुंबीजं बाहेर येतात— हस्तमैथुनासारखाच प्रकार! सेरोफ्रेजिया हे फूल परागसिंचन झाल्याशिवाय कीटकाला सोडतच नाही. या फुलाचा आकार तुतारीसारखा असतो, काम झालं की मग तुतारी वाकडी करून आतल्या कीटकाला जाऊ दिलं जातं....अशी शेकडो रहस्य लालित्यपूर्ण भाषेत सांगणारा, वनस्पतींमधील 'लैंगिक' संबंधांचा, त्यातील वैविध्याचा रंगीत पसारा मांडणारा हा डॉ. शरदिनी डहाणूकर यांचा लेख आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचारात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक ॲलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग डॉ. शरदिनी डहाणूकर (जन्म १९४५- मृत्यू  ४ ऑगस्ट २००२) यांनी प्रस्थापित केला.  त्याांनी डॉ.ऊर्मिला थत्ते यांनी मिळून आयुर्वेदावरील अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्याशिवाय डहाणूकरांची वृक्ष, फुले आणि अन्य वनस्पतींवरची माहितीपूर्ण ललित पुस्तकेही आहेत. ‘शुभ जंगल’ सावधान (मूळ शीर्ष ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीर्घा , शरदिनी डहाणूकर , मिळून साऱ्याजणी

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    सृष्टीच्या निर्मितीचा हा जीवनपट लेखिकेने फारच नाजूकपणे पण समर्थपणे सादर केला आहे. त्यात विनोदाची झालर असल्यामुळे एकदम भन्नाट अनुभव वाचतांना येतो.

  2. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    वाह फारच सुरेख रित्या मांडणी केलेली आहे. मी बॉटनी शिकलो आहे पण या मजेदार पणें सांगितली असती तर शिकायला फारच हुरूप आला असता!!

  3. ugaonkar

      5 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर. निसर्गात डवळाढवळ न केले तरच बरे.

  4. Nishikant

      5 वर्षांपूर्वी

    सृष्टीचा अद्भूत चमत्कार!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen