इश्श!


इश्श या मराठी शब्दाचा शब्दकोशांत दिलेला अर्थ आहे- राग, नापसंती, तिरस्कार, आग्रह वगैरे दाखवण्याच्या वेळी स्त्रीच्या तोंडून निघणारा हा उद्गार आहे. परंतु पुरुषांना आणि स्रियांनासुद्धा चांंगलेच माहिती आहे की, शब्दांत किंवा शब्दकोशांत सांगता येणार नाही, अशा अनेक अर्थच्छटा 'इश्श'ला आहेत. त्यापैकी असंख्य छटांचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. प्रभाकर बेंद्रे यांनी या लेखात 'इश्श' चा मजेदार मागोवा घेतलेला आहे. १९५१ साली प्रसिद्ध झालेला हा हलका फुलका लेख  नकळतच मराठी मानसिकतेत गेल्या अर्धशतकात झालेल्या बदलांवरही विचार करायला भाग पाडतो. अंक – यशवंत, डिसेंबर १९५१ स्त्रियांच्या तोंडी नेहमी आढळणारा साधा, अर्थपूर्ण पण अर्थशून्य शब्द. आणि अखेरीस माझं मलाच हसू आलं. मनांतल्या मनांत मी खूप खूप हसलो! ज्या वेळी माझ्या खोलीत कुणी डोकावून पाहिलं असतं तर त्याला शंका आली असती की, ‘हा मनुष्य वेडा तर नाही? याला वेड तर लागलं नाही ना!’ आणि खरोखरीच त्याने मला वेड्यांतच काढले असते. परंतु त्या वेळी माझ्या खोलीत कुणीच येणं शक्य नव्हतं! कारण एकतर मी लिहीत असताना खोलीचे दार आतून बंद करीत असतो व त्याप्रमाणे त्याही वेळी मी दार आतून बंद केलेलेच होते; व दुसरे म्हणजे घरांत मी व माझी बायको याखेरीज तिसरं माणूसच नव्हतं! आणि या वेळी माझी पत्नी धुणं धुण्यासाठी विहिरीवर गेलेली होती! तेव्हां ‘मी वेडा आहे’ असं ठरविणारा एखादा ‘शहाणा’ त्या वेळी खोलीत नव्हता हे मला समजले व मनास जरा बरे वाटले! परंतु मला कुणी ‘वेडा’ ठरविलं नव्हतं तरी, माझं मन मात्र मला ‘वेडा’ म्हणू लागलं होतं! आणि ‘लेखक’ हा ‘वेडा’ असतो हा अनुभव मला त्या वेळी येऊ लागला होता. परंतु असं होण्याचं कारण काय? कारण हेच क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , यशवंत

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मनोरंजक

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख मजा आली वाचताना आता हा शब्द दुर्मीळ झाला आहे

  3. ghansham.kelkar

      5 वर्षांपूर्वी

    फारच छान लेख

  4. patankarsushama

      5 वर्षांपूर्वी

    मस्त आहे लेख

  5. mhaskarmv

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर आणि मजेदार लेख

  6. ajitbmunj

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर व गमतीदार..पु. लं.नीच त्यांच्या एका लेखात "अय्या किंवा इश्श ला तसेच खरकटे या शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द सांगा असे आव्हान दिलेय त्याची आठवण झाली.. छान



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen