आंदोलन - तेव्हा आणि आता 

पुनश्च    भानू काळे    2020-02-05 06:00:36   

आणिबाणीच्या विरोधातील देशव्यापी चळवळ आणि दिल्लीत अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन यांचा उल्लेख स्वातंत्र्योत्तर भारतातील दोन महत्वाचे राजकीय सामाजिक लढे  म्हणून केला जातो. परंतु या दोन्ही लढ्यांमध्ये एक मूलभत फरक आहे....'अंतर्नाद'चे संपादक भानू काळे यांनी हा फरक अत्यंत स्पष्ट भाषेत आणि समपर्क तुलना करुन या लेखात सांगितलेला आहे.  आणिबाणीविरोधातील लढ्याच्या वेळचे भारलेले वातावरणही या लेखातून अत्यंत परिणामकारकतेने उभे राहते. 'अंतर्नाद'च्या मे २०१२ च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. ********** अंतर्नाद, मे २०१२ आणीबाणी विरोधातल्या आंदोलनात सामील झालेली आमच्यासारखी काही मंडळी १८ जानेवारी १९७७ची दुपार कधीच विसरणार नाहीत. मुंबईतल्या ताडदेव इथल्या अरुण चेंबर्समधल्या ‘हिंमत’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या छोट्याशा कार्यालयात आम्ही आठ-दहा जण कोंडाळे करून बसलो होतो. मधे टेबलावर एक छोटा ट्रान्झिस्टर ठेवला होता आणि कानात प्राण आणून आम्ही बातम्या ऐकत होतो. इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्तीची व सार्वत्रिक निवडणुकीची अत्यंत अनपेक्षित अशी घोषणा केली होती. सर्व राजबंद्यांची त्वरित सुटका करण्याचे आदेशही दिले होते. आमचा आनंद गगनात मावत नव्हता. अठरा महिन्यांनी काळरात्र आता संपली होती. जे ऐकत होतो, त्यावर खरेतर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्ही काही तरुण मंडळी मिळून जेमतेम पाच-सहा हजार खप असलेले हे इंग्रजी साप्ताहिक चालवत असू. सेन्सॉरच्या धाकाला न जुमानता आणीबाणीविरोधी आंदोलनाच्या बातम्या त्यात छापत असू. हिंमतची छपाई नेहमी ‘स्टेट्‌स पिपल प्रेस’ या छापखान्यात होई. मुंबईत फाउन्टन विभागात त्यांचा मोठा पाच मजली छापखाना होता. पण त्यांची स्वत:ची ‘जन्मभूमी’सारखी गुजरा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , राजकारण

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      2 वर्षांपूर्वी

    आणीबाणी विरुद्ध आंदोलन ही अल्पकाळात ऊभी राहिलेले प्रचंड आंदोलन होते ।हिम्मत मी वाचत असे ।या आंदोलनात ला जयप्रकाश यांचे नेतृत्व लाभले ,तसेच संघा चा मोठा पाठिंबा मिळाला।कित्येक स्वयंसेवक तुरुंगात होते।दत्ताजी भाले, सारख्या कित्येक प्रचारकाना अनेक यातना सहन कराव्या लागल्या।दत्ताजी लवकर च वारले।त्या आधी कोणताही आजार दत्ताजी ना नव्हता।समाजवादी मंडळी नि संघा ला कधीच श्रेय दिले नाही।

  2. [email protected]

      2 वर्षांपूर्वी

    यामध्ये हजारो संघ स्वयंसेवक, कार्यकर्ते 19महिने मिसाखाली स्थानबद्ध होते. ज्याचा उल्लेख अजिबात नाही.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen