मराठी माणूस : प्रतिमा व वास्तवता

रुची, ऑगस्ट १९८९

प्रस्तुत लेखात मराठी माणसाच्या स्वभावावर, त्याच्या गुणदोषांवर अरुण साधूंनी फार परखड शब्दात टीका केली आहे. पण ज्याचं आपल्या मातृभाषेवर खरं प्रेम आहे त्यालाच तिच्यावर अन्याय करणाऱ्या आपल्या भाषाबांधवांचा राग येणार ना? प्रश्न हा आहे की असे अनेक लेख वाचून सहज पचवून टाकणाऱ्या या त्यांनी उल्लेख केलेल्या मध्यमवर्गाला जाग कधी येणार? कधीपर्यंत हा समाज असा हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणार?

********

गेल्या काही दशकात मराठी भाषेची उत्तरोत्तर अवनती का होत आहे या गोष्टीचा विचार करताना आधुनिक मराठी माणसाच्या एकूण स्वभावविशेषाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. राज्यकारभारामध्ये व एकूणच सर्व उच्चस्तरीय व्यवहारांमध्ये असणारा इंग्रजी भाषेचा पगडा हे जरी मराठी आणि इतर भारतीय भाषांच्या ऱ्हासाचे एक प्रमुख कारण असले तरी त्या त्या भाषिक समाजाचे ठळक गुणविशेष व सामाजिक वृत्ती यांचाही त्या भाषेची जडण-घडण, विकास, समृद्धी वा ऱ्हास यावर परिणाम होत असतो यात शंका नाही. इंग्रजी समाजाच्या विजिगीषु व्यापारी वृत्तीतूनच त्यांची भाषा वाढली व सप्तखंडात तिचा फैलाव झाला हे सर्वमान्य आहे. आणि इंग्रजी भाषेच्या आक्रमक दडपणांवर मात करूनही आपल्या चिवटपणाच्या जोरावर कॅनडातील फ्रेंच भाषिक समाजाने आपली भाषा न सोडता ती जपून ठेवली हेही सर्वज्ञात आहे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

 1. राजेन्द्र कडू

  परखड लेख,
  वस्तुस्थितीची जाणीव करून देणारा.

 2. mugdhabhide

  ha lekh samast madhyamvargaparyant kasa pochel yacha vichar karayala havay. karan etake parakhad vichar pachavane sope nahi aani tyakade durlaksha karane khoopach sope aahe.

 3. Smita

  अतिशय वास्तववादी आणि परखड शब्दात मराठी माणसाच्या संकुचित वृत्तीचे वर्णन साधूंनी केले आहे … आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे …

Leave a Reply