मी लेखक कसा झालो ( ऑडीओसह )

अंक : ललित, ऑक्टोबर १९७३

लेखाबद्दल थोडेसे: लेखक लिहितो तेंव्हा त्याच्या लेखनामागे केवळ त्याला मिळालेले सृजनाचे वरदान असते का? अर्थातच नाही. कारण लेखक होणे ही फार पुढली गोष्ट झाली, लेखक आधी घडत असतो आणि आपण घडतो आहोत याचा त्याला स्वतःला आणि त्याच्या परिघातील इतर लोकांनाही पत्ता नसतो. या घडण्यातूनच मग तो अचानक कधीतरी प्रकटतो. आधी स्वतःसमोर मग लोकांसमोर. तर गंगाधर गाडगीळांनी  (२५ ऑगस्ट १९२३ – १५ सप्टेंबर २००८)  त्यांच्या अशाच घडण्याची आणि प्रकट होण्याची त्यांची बहारदार गोष्ट या लेखात सांगितली आहे.

लक्ष्मी आणि सरस्वती सुखानं  एकत्र नांदावी, तसे अर्थशास्त्र आणि ललित साहित्य हे दोन गुण गाडगीळांच्या ठायी होते. अर्थशास्त्रात आवश्यक असलेली ‘हा सूर्य, हा जयद्रथ’  वृत्ती त्यांनी ललित लेखनात येऊ दिली नाही आणि साहित्यातील हळवेपणाचा स्पर्श कधी आर्थिक विषयावरील लेखनाला येऊ दिला नाही. लेखक म्हणून गाडगीळांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णन,  विनोदी साहित्य, बालसाहित्य असे नाना प्रकार हाताळले, परंतु नवकथांचे आणि मराठी साहित्यातील नवतेच्या एका प्रवाहाचे श्रेय त्यांना प्रामुख्याने दिले जाते .कडू आणि गोड ,  तलावातील चांदणे  इत्यादी  कथासंग्रह. लिलीचे फूल ही कादंबरी,दुर्दम्य ही लोकमान्य टिळकांवरील कादंबरी, मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र आणि बंडू ही खुमासदार व्यक्तिरेखा अशा विपुल साहित्यातून गाडगीळ आपल्याला भेटत आले आहेत.

ललित अंकामध्ये आक्टोबर १९७३ मध्ये प्रसिदध झालेला हा लेख घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी पुनश्च…वाचूया आणि ऐकूया ‘मी लेखक कसा झालो’…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 8 Comments

  1. arvindjoshi

    हा लेख वाचून मला, मी पत्रकार कसा झालो, हे लिहिण्याची ऊर्मी जागी झाली आहे.

    1. सुरेश कुलकर्णी

      जोशी सर,खरंच तुम्ही मी पत्रकार कसा झालो ?हे लिहा .
      सु.मा.कुलकर्णी, नांदेड.

  2. ppkchemicals@gmail.com

    छान वेगळा लेख

  3. dspkop@gmail.com

    खूप छान प्रेरणादायी

  4. rashmipp

    सहज, सोपा, सुरेख

  5. mbdeshmukh

    खूपच छान लेख आहे. लेखनात किती सहजता आहे .

  6. mailimaye@gmail.com

    Atyant sundar !

  7. atmaram-jagdale

    आतिषय सुंदर असा लेख वाचायला मिळाला . लेखक कसा घडत जातो ‘ याचं मार्गदर्शनच लेखकाने घडवलं . आमच्या सारख्या सैरभैर वाचन करणाऱ्या वाचकांनी कोणत्या तरी एका स्थितीला लिहायला हवं म्हणजे वाचकाची वाटचाल लेखकाकडे होईल . किमान मागच्या पिढीतील लेखकांच्या प्रेरणा आणि त्यांचा भोवताल खूपच अनुकूल होता . एकंदरीत लेख आवडला . गाडगीळांची फक्त दोनच पुस्तके वाचायला मिळाली ती म्हणजे तलावातील चांदणे आणि दुर्दम्य !

Leave a Reply