एका लग्नाच्या कथेची व्यथा (ऑडीओसह)

पुनश्च    अज्ञात    2020-06-17 06:00:33   

अंक : एकता, आषाढ १८८६

मोहनच्या धाकट्या बहिणीचं लग्न ठरलं! मोहनला अतिशय आनंद झाला. परंतु लग्न म्हणजे एक फार मोठी परीक्षा याची त्याला कल्पना नव्हती. त्याची कल्पना होती की दोन घराण्यांचे कायमचे ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी झटणारे वरपक्षाकडील लोकही तसेच समंजस आणि मुद्दाम अडवणूक करून आपल्या तावडीत सापडलेल्या वधूपक्षाला त्रास न देणारे असतील. पण त्याला आलेला हा अनुभव मोठा विचित्र होता. हा असाच अनुभव अनेकांना येत नसेल कशावरून?

मोहनच्या धाकट्या बहिणीचे लग्न ठरले. गेले ५-७ वर्षे, तो स्वतः अतिशय चिकाटीने त्यासाठी प्रयत्न करीत होता. कोणी काही सांगे, कोणी काही! पण मोहनने त्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे धावपळ केली, अक्षरशः छाती फुटेपर्यंत! घरात इतर पुरुषमंडळी नव्हती असे थोडेच आहे? पण त्यांना या जबाबदाची जाणीव असले तर ना? निव्वळ दोनदा जेवायला आणि एकदा झोपायला येण्यापुरता त्यांचा घराशी संबंध! बाकी घरात काय चालले आहे, धान्य आहे की नाही, कोणी आजारी वगैरे आहे की काय, याची काळजी कोण करणार?

***

कथा ऐकण्यासाठी खालील ऑडीओ ट्रॅकवर क्लिक करा.  (व्हॉइसओव्हर - अक्षय वाटवे)

[audio mp3="https://bahuvidh.com/wp-content/uploads/2020/05/Eka-Lagnachi-Vyatha.mp3"][/audio]

***

बिचारा मोहन, त्याला हे सर्व दिसत होते; पण त्याने एक अवाक्षरही उच्चारले नाही. तो म्हणे, “बाकीचे भाऊ काय करतात हा माझा विषय नाही. मी काय करावे, येवढेच मी जाणतो.” शेजारीपाजारीसुद्धा मोहनच्या या विचारसरणीने थक्क होत. कोणी उद्गार काढत, “वेडा आहे झ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


कथा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.