माझी साहित्यिक धूळपाटी (ऑडीओसह)

अंक : ललित, जानेवारी १९६९

लेखाबद्दल थोडेसे: अनंत काणेकर  (२ डिसेंबर १९०५- २२ जानेवारी १९८०  ) हे मराठीतील एक शैलीदार लेखक. ललित लघुनिबंध लेखनाला त्यांनी प्रतिष्ठा मिळून दिली.  मराठी साहित्यात लेखनाचा तो प्रकार  काणेकरांमुळेच रुळला आणि पुढे अनेकांनी तो स्वीकारला,समृद्ध केला. पत्रकार, वकील, प्राध्यापक, संपादक अशा विविध बिरुदावल्या त्यांना लावता येतील. सुरुवातीला काव्यलेखन केल्यावर पुढे मात्र त्यांनी ललित लेखनावर लक्ष केंद्रीत केले. रंगभूमीवरही ते लेखक म्हणून वावरले. पिकली पाने (१९३४) हा त्यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह.  रुढ संकेतांना धक्के देणारी चतुर वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा हे त्यांच्या लघुनिबंधांचे विशेष गुण आहेत. शिंपले आणि मोती (१९३६), तुटलेले तारे (१९३८), उघडया खिडक्या (१९४५) व विजेची वेल (१९५६) हे त्यांचे अन्य लघुनिबंधसंग्रह . तर, धुक्यातून लालताऱ्याकडे ! (१९४०), आमची माती आमचे आकाश (१९५०), निळे डोंगर तांबडी माती (१९५७), रक्ताची फुले (१९५९) खडक कोरतात आकाश (१९६४), सोनेरी उन्हात पाचूची बेटे आणि गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या (१९६९) ही त्यांची प्रवासवर्णनपर पुस्तके.

आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली हे सांगताना प्रस्तुत लेखातही त्यांनी चटपटीत शैली, छोटी छोटी निरिक्षणे आणि सहजपणे गतकाळाचे उल्लेख करीत वातावरण निर्मिती केली आहे. आजच्या काळात लिहिणारे अनंत आहेत, परंतु ‘काणेकरी’ शैली मात्र अभावानेच आढळते. १९६९ साली काणेकरांनी ‘ललित’ मध्ये लिहिलेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च…

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. sumamata@gmail.com

  अनंत काणेकर यांची प्रवास वर्णने आणि एकांकिका वाचल्या होत्या .आज त्यांच्यातला लेखक कसा घडला हे समजले.धन्यवाद.बहुविध डिजिटल मीडिया (BDM)

 2. sumamata@gmail.com

  गंगाधर गाडगीळ ,मला एम ए ला स्पेशल ऑथर म्हणून होते. त्यांच्या एकांकिका आम्ही बी एड च्या वर्गात सादर केल्या आहेत .मी कसा झालो? कऱ्हेचे पाणी ही आचार्य अत्रे यांचेग्रंथ वाचले होते.आटोपशीरपणे गंगाधर गाडगीळ यांनी आपण लेखक म्हणून कसे घडलो ,हे या लेखात मांडले आहे.अनेकांना हे लेखन वाचून लेखक कसा तयार होतो हे समजेल.

 3. mukunddeshpande6958@gmail.com

  वाह, सुंदर

 4. advshrikalantri@gmail.com

  छान .सरळ सोपे कथन ।आवडले

 5. atmaram-jagdale

  छान माहिती पूर्ण लेख आहे .दुदैवाने काणेकरांच आपण काहीच कसं वाटलं नाही याचा खेद वाटला . त्यांच्या निबंधाचे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचेन .

 6. jsudhakar0907

  छान !
  Audio Track ची आणि ‌लेख वाचनाची अशी दोन्हींची मजा वेगळी आणि विशेष आहे.
  मनःपूर्वक धन्यवाद !!

Leave a Reply