अनंत काकवा प्रियोळकर

पुनश्च    पु. आ. चित्रे    2020-09-09 06:00:40   

अंक :अभिरुचि, दिपावली १९९४ लेखाबद्दल थोडेसे : अ. का. प्रियोळकर (५ सप्टेंबर १८९७-१३ एप्रिल १९७३) हे इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व  लेखक होते. त्यांच्या प्रेरणेनेच मुंबईत मराठी संशोधन मंडळाची स्थापना झाली.  त्यांचा जन्म गोव्यातील प्रियोळ ह्या गावचा. १९२५ साली विविधज्ञानविस्ताराचे काम पाहण्यासाठी ते मुंबईस आले. १९२६ मध्ये मुंबई नगरपालिकेत त्यांनी नोकरी धरली.  १९४८ साली ‘मराठी संशोधन मंडळा’च्या उपसंचालकपदी त्यांची नेमणूक झाली १९५० पासून ते ह्या मंडळाचे संचालक झाले.  या मंडळाद्वारे मराठी संशोधनकार्याला त्यांनी निश्चित स्वरूपाची बैठक दिली आणि गतीही आणली. ग्रंथसंपादनाबरोबरच मौलिक असे इंग्रजी-मराठी ग्रंथलेखनही प्रियोळकरांनी केलेले आहे. द प्रिंटिंग प्रेस इन इंडिया (१९५८), गोवा री-डिस्कव्हर्ड (१९६७), द गोवा इंक्विझिशन (१९६१), ग्रांथिक मराठी भाषा आणि कोंकणी बोली (१९६६) हे त्यांचे काही ग्रंथ. कोंकणी ही मराठीहून वेगळी भाषा आहे, हे मत प्रियोळकरांना मान्य नव्हते. कोंकणी-मराठी वादात त्यांनी मराठीचा हिरीरीने पुरस्कार केला. त्यामुळे कोंकणीवादी त्यांचा द्वेष  करत. गोव्यातील ख्रिस्ती आणि हिंदू ह्या दोन समाजांतील भावनात्मक एकात्मता हा त्यांचा ध्यास होता. प्रियोळकरांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख २५ वर्षांपूर्वीचा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ******** ज्याने ज्ञानक्षेत्रातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांची शताब्दी साजरी करण्यात सदैव उत्साह दाखवला अशा स्वतः उत्तुंग कर्तृत्वाच्या अनंत काकवा प्रियोळकरांसारख्या आगळ्या ज्ञानर्षीच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. त्यामुळे आपण आता ती जन्मशताब्दी कशी साजरी करत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अभिरुची , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. jrpatankar

      4 वर्षांपूर्वी

    तेथे कर माझे जुळती.

  2. asiatic

      4 वर्षांपूर्वी

    कर्तृत्ववान व्यक्तीवर लिहिलेला लेख, त्यांची दखल घेतली आहे हे विशेष. याशिवाय प्रियोळकरांनी संशोधनपर अनेक कामे केली. डॉ. भाऊ दाजी लाड यांच्याप्रमाणेच त्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे अपूर्ण आत्मचरित्र मोठ्या प्रयत्नपूर्वक मिळवून त्याला चरित्राची जोड दिली. मराठी व्याकरण, ग्रंथव्यवहार यासंबंधी अनेक संशोधनपर लेख लिहिले. (वाचकांच्या माहितीसाठी)

  3. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे, माहिती पुर्ण



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen