कथा - अक्का (ऑडीओसह)

पुनश्च    मालती जोशी    2020-08-19 06:00:26   

अंक – वाङ्मयशोभा, मे १९६६

कथेबदद्ल थोडेसे : स्त्रीयांच्या बाबतीत अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. शंभर वर्षात जग बदललं, सुधारलं आणि पुढे गेलं. परंतु 'पुढे गेलं' तरी मागचं संपत नाही, गतकाळाच्या कपाटात ते राहतं. ही कपाटं अधूनमधून उघडली पाहिजेत, म्हणजे आपण कुठं होतो, कुठंवर आलो ते तर कळतंच, आणखी किती पल्ला गाठायचा आहे, त्याचंही भान येतं. बालविवाहाची प्रथा जेवढी भयंकर होती, त्याहून अधिक क्रूर होती बालविधवांना मिळणारी वागणूक. बालविवाह होऊन, शरीराची समज येण्यापूर्वीच वैधव्य आल्यावर त्या स्त्रीचं सगळं जगणं एखाद्या काळोख्या गुहेसारखं होऊन जात असे. अशाच एका स्त्रीची ही कथा अत्यंत संयत तरीही टोकदार भाषेत आपल्याला सांगितली आहे  मालती जोशी यांनी.

'पुनश्च'चा चमू जेंव्हा सदस्यांसाठी शेकडो,हजारो जुन्या लेखांमधून चांगले काही शोधते तेंव्हा अनेकदा त्या लेखांचे, कथांचे लेखक फारसे माहिती नसण्याचे प्रसंग येतात. तरीही आम्ही अशा लेखकांची माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो. मालती जोशी यांची प्रस्तुत कथा १९६६ साली प्रसिद्ध झालेली आहे. या नावाचा शोध घेतला असता, हिंदी साहित्यातील कथा लेखनात हे नाव अत्यंत मानाचे असल्याचे दिसून आले. हिंदीत प्रसिद्ध असलेल्या लेखिका मालती जोशी या मूळच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील. पुढे त्या मुंबईत आल्या, मग दिल्लीत गेल्या, काही काळ इंदूरातही होत्या. त्यांना पद्मश्रीसह अनेक सन्मानही प्राप्त झाले आहेत. त्यांचा जन्म १९३४ चा असल्याने बरेचसे संदर्भ जुळतात. मालतीबाईंनी मराठीतही लेखन केल्याचा उल्लेख आहे, तेंव्हा आजच्या कथेच्या लेखिका बहुधा त्याच असाव्यात. पुनश्चच्या वाचकांपैकी कोणाला या संदर्भात काही वेगळी माहिती मिळाली, मालतीबाईंच्या मराठी  ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


कथा , वाड्मयशोभा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.