माझ्या आनंदाचे निधान (ऑडीओसह)

अंकः ललित, सप्टेंबर १९६९

लेखाबद्दल थोडेसे : साठ वर्षे अविरत लेखन. कथासंग्रह, कादंबऱ्या, लघुनिबंध संग्रह यांची सख्या सत्तरहून अधिक आणि लेखक म्हणून लोकप्रियता अफाट…! एवढं सगळं लिहूनही ना. सी. फडके यांना प्रश्न पडतो, आपण हे एवढं का लिहिलं? या प्रश्नाच्या शोधात ते स्वतःच्याच अंतरंगात डोकावले तेंव्हा त्यांना काय वाटलं, याचे हे विवेचन. कोणत्याही लेखकाला, वाचकाला हे वाचता वाचता साहित्याच्या प्रयोजनापासून तर आयुष्याच्या अर्थापर्यंत अनेक बाबतीत, अनेक प्रश्न पडतील. काहीची उत्तरे सापडतील, काहींची सापडणार नाहीतही..पन्नास वर्षांपूर्वीचा हा लेख फडक्यांची शैली किती टवटवीत आहे याचा प्रत्ययही देतो.

********

गझनीच्या महंमदाची अशी गोष्ट सांगतात की त्याचा अंतकाल जवळ आला तेव्हा हयातभर पराक्रम करून मिळविलेली संपत्ती डोळ्यांनी पहावी अशी त्याला इच्छा झाली. ती बघून त्याच्या मनात काय विचार आले असतील कोण जाणे.

मी पैसा मिळविला; मित्र जोडले; कमलासारख्या गुणी, रसिक, सुंदर स्त्रीच्या प्रेमाचा उपभोग घेतला; रोहिणी, अंजली, विजय या गुणी बुद्धीमान मुलांची माया आणि भक्ती मिळविली – हे सारे मी कमावलेल्या धनाचेच प्रकार म्हणावे लागतील. परंतु माझं मोठ्यातलं मोठं धन कोणतं तर मी लिहिलेले ग्रंथ. गझनीच्या महमदाप्रमाणे ही ग्रंथसंपत्ती जेव्हा मी बघतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रश्र्न करतो, जवळजवळ साठ वर्षे सतत निष्ठेनं लेखनाचा उद्योग करून ही जी ग्रंथसंपत्ती मी निर्माण केली ती कशासाठी? कोणत्या हेतूनं?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 3 Comments

  1. mukunddeshpande6958@gmail.com

    अप्रतिम

  2. vineshsalvi21

    पुनश्च!!!

  3. hemant.a.marathe@gmail.com

    लेखक प्रसिद्ध असूनही जमीनीवर आहे हे दिसून येते

Leave a Reply