देवमासे आणि शिकारी


अंक – श्रावण, जून १९९९

लेखाबद्दल थोडेसे : देवमासा उर्फ व्हेलची दहशत, ताकद आणि अवाढव्यता आपल्याला स्पिलबर्गच्या सिनेमांत दिसली, एरवी त्याचे हे रूप एवढ्या सहजतेने दिसले नसते. निसर्गाने निर्माण केलेल्या अद्भभूत प्राणीसृष्टीतले देवमासा हे एक आश्चर्य आहे. देवमासा आणि मानव यांच्यातील संघर्षाच्या कथेची अनेक पुरातन आवर्तने आहेत.  प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असतो, कारण अनेकदा  क्रोर्य कुठले आणि जगण्यातली अपरिहार्यता कुठली हे ठरवणे अवघड असते. माणूस अर्थातच ताकदीने नसला तरी बुद्धीने अफाट असल्याने देवमाशांवर भारी पडत आला आहे. या दोघांमधील संघर्षावरील हा लेखही तेवढाच अफाट आहे.माणूस फार पूर्वीपासून देवमाशांची शिकार करीत आला असावा. ही शिकार बहुदा दिवाबत्तीसाठी लागणाऱ्या तेलासाठी त्याने केली असावी. परंतु देवमाशाच्या जिभेचा वापर सागरी सफरी करणाऱ्या लोकांच्या आहारात केला जात होता असा उल्लेख सर्व प्रथम १५६८ मध्ये गिलॉम रॉन्डेलेट यांनी केलेला आढळतो. देवमाशांच्या शिकारीचं सर्वात जुनं ठिकाण म्हणून मेलिंग नॉर्वेचा उल्लेख केला जातो. इथे ख्रि.पूर्व १८०० मधील गुफा चित्रांमध्ये बोटीत बसून फवारा उडवणाऱ्या प्राण्यांचा पाठलाग करणाऱ्या माणसांचे चित्र चित्रित केलेले आढळते. स्ट्रॅबोने पहिल्या शतकात लिहिलेल्या ‘जिऑग्राफी’ या पुस्तकात, ‘मासे खाणारे लोक देवमाशाच्या जबड्याचा वापर दाराचा अडसर आणि त्याच्या बरगड्यांचा वापर घरातील चौकटी आणि कमानींसाठी करीत’ असे म्हटले आहे.

सुरवातीला फक्त किनाऱ्यावर वाहून आलेल्या देवमाशांचा वापर होईल. ते मेलेले नसतील तर त्यांना भाले खुपसून मारलं जाई. सम्राट क्लॉडिक्सच्या काळात पहिल्या शतकात ऑस्टिआ बंदरात आलेल्या ‘ओर्का’च्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


श्रावण , ज्ञानरंजन , पर्यावरण

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.