कथा - सौदा (ऑडीओसह)

पुनश्च    शं. ना. नवरे    2020-09-19 06:00:01   

अंक – सत्यकथा, जून १९५१

कथेबद्दल थोडेसे : चटपटीत शैली, बारीकसा धक्का देणारा आशय, व्यक्तिरेखाचित्रणाची कमाल आणि उत्तम वातावरण निर्मिती ही शन्नांच्या (शं.ना नवरे. २१ नोव्हेंबर १९२७-२५ सप्टेंबर २०१३)  कथांची वैशिष्ट्य. मानवी स्वभावातील संगती आणि विसंगती दोन्ही ते सहज कथानकाच्या चिमटीत धरत असंत. कथा,कादंबरी, नाटक,  चित्रपट पटकथा असा शन्नांचा लेखन संसार अमाप आहे. एवढे प्रचंड लिहूनही त्यांच्या शैलीतली प्रसन्नता आणि नाविन्य कधीच हरवले नाही. त्यांच्या याच धाटणातली ही कथा आहे. वाचा किंवा ऐका किंवा दोन्ही.********

राऊंड टेंपलजवळच्या एका गल्लीत तोंडाशी असलेल्या ‘कॅफे हैदरी’ हॉटेलांतल्या साडे पांच—छे चा बखत. आजूबाजूला रस्ते गजबजलेले. जिकडे पहावं तिकडे हिरव्या चौकड्यांच्या लुंग्यांत नि गोंडेदार तांबड्या टोपींत वावरणारे मुसलमान नि काही बुरख्यांतल्या बायका. अधूनमधून एखादा पांढऱ्या कपड्यांतला गुजराती किंवा मराठा. रस्त्यावर एखाद मुसलमान छत्रीच्या सांवलीत, पत्र्याच्या डब्यांत ठेवलेली असली गांवठी औषधं विकत बसलेला. दुकानांच्या पायऱ्यांवर बसलेले अत्तरं विकणारे काही मुसलमान. कुणी कापूस लावून ठेवलेली काडी कानावर अडकवून नि जवळ छोटीशी चामड्याची बॅग घेऊन मळ काढणारे. त्या बहुतेकांच्या टोंकदार मिशा. किराणा मालाची मकाणं, रद्दीची मकाणं, बुटांची मकाणं—नि बहुतेक सर्व बकाल. गल्लीत बैदुलं खेळणारी मळक्या अंगाची नि अंगाला मोठ्या होणाऱ्या गडद रंगच्या खमिसांतली पोरं. जवळपास कुठंही सौंदर्य नाही पहायला!

‘काफे हैदरी’ मुसलमानांच्या दृष्टीनं मोठं शाही होटेल. बाहेर उर्दू लिपींत लिहिलेली पदार्थांची नावं नि बरोब्बर मध्यावर तांबड्या नि हिरव्या रंगांत लिहिलेलं ऐ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


कथा , सत्यकथा

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.