वाईः ७० (१२५) वर्षांपूर्वी

पुनश्च    अनंत तडवळकर    2020-09-23 06:00:14   

अंक : अमृत, मार्च १९६५

लेखाबद्दल थोडेसे : आज आपल्याला वाई हे शहर मुख्यतः आठवतं ते तर्कतीर्थ लक्ष्णशास्त्री जोशी यांनी वाईतील प्राज्ञपाठशाळेतून  विश्वकोशाचा महान प्रकल्प सिद्धीस नेऊन मराठी भाषेवर करुन ठेवलेल्या अनंत उपकारांमुळे. वाईमध्ये एकेकाळी अशा  पंधरा-वीस तरी पाठशाळा नक्कीच होत्या, असे म्हणतात. अलिकडे महाबळेश्वरला लोकांचे जाणे येणे वाढल्यापासून लोक वाईलाही जाऊन येतात, कारण 'स्वदेस' या चित्रपटानंतर या परिसराविषयीचे आकर्षण वाढले आहे. तिसरी महत्वाची बाब आहे मेणवली येथील नाना फडणवीसांचा वाडा. वाईपासून काही किलोमिटर्सवर असलेला हा वाडा पहायलाही अनेकजण जातात. तर अशा वाई या शहरात एकेकाळी कसे धार्मिक वातावरण होते, तेथील लोकजीवन कसे होते याचा हा अतिशय रंजक असा लेखजोखा आहे. या लेखात 'एकेकाळी' असा उल्लेख करुन वाईचे जे वर्णन केले आहे ते सत्तर वर्षांपूर्वीचे. आता हा लेख प्रकाशीत होऊन पंचावन्न वर्षे झाली आहेत, म्हणजे या लेखातली वाई १२५ वर्षांपूर्वीची आहे. या लेखात सांगितलेले लोकजीवन आता केवळ इतिहासातच आहे, परंतु ५५ वर्षांपूर्वीच्या या वर्णनातील अनेक खाणाखुणा मात्र आजही दिसतात. हा लेख वाचताना आपल्याला काळयंत्रात बसून १२५ वर्षे मागे गेल्याचा भास होतो..********

आता वाईमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. वीज, पाणी, घरें यांच्या अनेक नव्या सुखसोयी वाईकरांना उपलब्ध झालेल्या आहेत. शाळेतल्या शिक्षणपद्धतींतही बदल झाला आहे. लोकांची राहणी, पोशाख बदलले आहेत. नव्या चालीरीतींचा उदय झालेला आहे. विचार बदलले आहेत. जुन्या काळाच्या कांही खुणा सोडल्या तर वाईचे स्वरूप खूपच बदलले आहे.

सत्तर वर्षांपूर्वी या बदलाची मुळीसुद्धा कल्पना आली नसती, इतके ते वेग ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


इतिहास , समाजकारण , स्थललेख , अनुभव कथन , अमृत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.