सर्दी


अंक : नवाकाळ दिवाळी १९५८ लेखाबाबत थोडेसे : 'पुलं' होण्यासाठी विनोदबुद्धी हवी, हा समज साफ म्हणजे साफच चुकीचा आहे. विनोदबुद्धी फार नंतर येते, त्या आधी  अफाट निरीक्षण क्षमता आणि रसरशीत रसिकता या दोन गोष्टी आवश्यक असतात. या दोन गोष्टींच्या खांद्यावरच सृजनाची प्रतिभा उभी राहते आणि कुणाला विनोदाच्या रस्त्याने घेऊन जाते तर कुणाला कवितेच्या. पुलंचा आजचा लेख वाचला तर त्यांच्या निरीक्षण क्षमतेचा हेवा वाटेल. सर्दी नामक एक छोटासा आजार तो काय, परंतु सर्दीचे, सर्दीने माणसाच्या होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करताना पुलंच्या प्रतिभेचे इंद्रधनुष्य सप्तरंगांच्याही अनेक छटा या लेखात दाखवतात. माणूस म्हणून त्यांनी केलेली निरीक्षणे, जातीचा खवैया म्हणून केलेली निरिक्षणे, विनोदी भाष्यकार म्हणून केलेली निरिक्षणे आणि...'पुरुष' म्हणून केलेली निरीक्षणे. लेख वाचा म्हणजे निरिक्षणांचे हे वर्गीकरण तुम्हाला हळूहळू कळू लागेल. पुलं अफाट प्रतिभावंत आहेत..त्यांच्या प्रतिभेचे असे कित्येक तरी आविष्कार आपण अद्याप पाहिलेले नसतील. जसा हा आविष्कार 'नवाकाळ'च्या १९५८च्या दिवाळी अंकात दडून बसलेला होता आणि 'पुनश्च' च्या वाचकांसाठी आम्ही शोधून काढला. ******** (एक द्रवानुभूतिः एक चिंतन आणि एक शिंग.) सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही कांही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधि लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सद ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , नवाकाळ

प्रतिक्रिया

  1. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम पु ल द ग्रेटच.

  2. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम! बासष्ट वर्षं झाली तरी अजून तितकाच ताजा वाटतो लेख! मला आत्ता सर्दी झाली नसल्यामुळे या लेखाचा सुंदर वास आला.

  3. kaustubhtamhankar

      5 वर्षांपूर्वी

    फारच सुंदर. बरेच दिवसांनी पुल वाचले. पुलंच्या लिखाणाला देखील एक वास आहे. लेखा खाली पुलंचे नावजरी नसले तरी हे पुल हे ओळखता येते.

  4. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    लाजवाब आहे!

  5. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    मस्तच

  6. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    खुपच छान,पु.ल.नेहमीच महान

  7. [email protected]

      5 वर्षांपूर्वी

    पुलं बद्दल आपण काय लिहिणार ‌? खरच ग्रेट!

  8. atmaram-jagdale

      5 वर्षांपूर्वी

    खूपच सुंदर लेख . आज करोनाच्या काळात सर्दीला खूपच भाव आला आहे . आम्ही सर्वेक्षण करताना पाहिल्यांदा विचारतो - सर्दी आहे का ? अशी ही गंमत . पुल ग्रेटच !

  9. shripad

      5 वर्षांपूर्वी

    खल्लास! एकदम झकास!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen