सर्दी


अंक : नवाकाळ दिवाळी १९५८

लेखाबाबत थोडेसे : 'पुलं' होण्यासाठी विनोदबुद्धी हवी, हा समज साफ म्हणजे साफच चुकीचा आहे. विनोदबुद्धी फार नंतर येते, त्या आधी  अफाट निरीक्षण क्षमता आणि रसरशीत रसिकता या दोन गोष्टी आवश्यक असतात. या दोन गोष्टींच्या खांद्यावरच सृजनाची प्रतिभा उभी राहते आणि कुणाला विनोदाच्या रस्त्याने घेऊन जाते तर कुणाला कवितेच्या. पुलंचा आजचा लेख वाचला तर त्यांच्या निरीक्षण क्षमतेचा हेवा वाटेल. सर्दी नामक एक छोटासा आजार तो काय, परंतु सर्दीचे, सर्दीने माणसाच्या होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करताना पुलंच्या प्रतिभेचे इंद्रधनुष्य सप्तरंगांच्याही अनेक छटा या लेखात दाखवतात. माणूस म्हणून त्यांनी केलेली निरीक्षणे, जातीचा खवैया म्हणून केलेली निरिक्षणे, विनोदी भाष्यकार म्हणून केलेली निरिक्षणे आणि...'पुरुष' म्हणून केलेली निरीक्षणे. लेख वाचा म्हणजे निरिक्षणांचे हे वर्गीकरण तुम्हाला हळूहळू कळू लागेल. पुलं अफाट प्रतिभावंत आहेत..त्यांच्या प्रतिभेचे असे कित्येक तरी आविष्कार आपण अद्याप पाहिलेले नसतील. जसा हा आविष्कार 'नवाकाळ'च्या १९५८च्या दिवाळी अंकात दडून बसलेला होता आणि 'पुनश्च' च्या वाचकांसाठी आम्ही शोधून काढला.********

(एक द्रवानुभूतिः एक चिंतन आणि एक शिंग.)

सर्दी हा एक मोठा चमत्कारिक रोग आहे. वास्तविक रोग म्हणवून घेण्याच्या लायकीचाही हा रोग नाही. ‘रोग’ ह्या शब्दालाही कांही दर्जा आहे. दमा, क्षय वगैरे भारदस्त मंडळींनाच ही उपाधि लागू पडते. रक्तदाब हा मला वाटते एक नुसता विकार आहे. मधुमेह हा विकार आणि रोग ह्यांच्या सीमारेषेवर घुटमळणारा चाळीशी उलटलेला गृहस्थ आहे. पण सर्दी ही नुसतीच एक पीडा आहे. पूर्वी नथ-पाटली वगैरे ‘दागिन्यां’च्या सद ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


विनोद , नवाकाळ

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.