सुरती रुपया आणि यशाचे गणित (ऑडीओसह)

अंक : श्रीदीपलक्ष्मी, जानेवारी १९५९ 

लेखाबद्दल थोडेसे : मराठी चित्रपट समीक्षेच्या क्षेत्रात ‘खटकेबाज संवाद’ या शब्दसमुहाचा जन्म दिनकर द. पाटील यांनी लिहिलेल्या संवादांमुळे झाला होता.  त्यांच्या चित्रपटांत पडद्यावरील व्यक्तिरेखांचे सवाल-जवाब म्हणजे जणू शब्दांचे फटाके असत, त्यातूनच पाटलांनी लिहिलेल्या संवादांचा उल्लेख  नेहमी ‘खटकेबाज संवाद’ असा होऊ लागला. असे संवादी ‘खटके’ लिहिण्यासाठी लेखकांत युक्तीवाद-प्रति युक्तिवाद करण्याची विलक्षण ताकद असावी लागते. पाटील यांच्या अशा ताकदीचा अंदाज आजचा हा लेख वाचताना येतो. विषय़ खूप साधा आहे. शिक्षण क्षेत्रात (तेंव्हापासूनच ) आलेली, मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडू द्यावे अशी टूम आणि यश म्हणजे नेमकं काय? या प्रश्नांच्या उत्तरात शिरताना पाटलांनी अशी काही चौफेर टोलेबाजी केली आहे की आपण लेखाच्या पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत कधी पोचतो ते कळतच नाही.  तुम्ही स्वतःच अनुभव घ्या ना..

आणि हो, लेखाच्या शीर्षकात सुरती रूपया आहे, लेखातही हा शब्द आलेला आहे. तेंव्हा सहज उत्सुकता जागी झाली असेल तर सुरती रुपयाविषयी ही रंजक माहिती वाचा, म्हणजे पाटलांनी त्यांच्या लेखात तो शब्दप्रयोग का केला तेही आपल्याला कळेल-

१७व्या शतकाच्या मध्याला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुरत हे बंदर ह्या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले. सुरतेत धनाढ्य व्यापाऱ्यांचा राबता सुरू झाला. शाहजहान आणि औरंगझेब ह्या बादशाहांच्या काळात सुरतेची टांकसाळ ‘रुपया’चे सर्वाधिक उत्पादन करू लागली. धातूची शुद्धता आणि वजनाची हमी ह्या बाबतीत ‘सुरती’ रुपया विश्वसनीयतेचे जणू प्रतीक बनला. सुरती रुपयाच्या विश्वसनीयतेमुळे डचांनी १७ व्या शतकाच्या मध्यास त्याचा वापर एक ‘व्यापाराभिमुख’ चलन म्हणून करायला सुरुवात केली. डच जहाजांबरोबर सुरती रुपया त्यांच्या प्रभावाखालील सीलोन (श्री लंका) तसेच डच ‘ईस्ट ईंडीज’ म्हणजे आजच्या इंडोनेशियातील जावा अशा दूरदूरच्या प्रांतात पोचला. (ही माहिती वाचून रूपयाच्या इतिहासाच्या खोलात जावेसे वाटले तर लिंक- https://aisiakshare.com/node/2314)

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. vineshsalvi21

    अप्रतिम…कमी शब्दांत विषय मांडण्याची कला.सद्या दुर्मिळ आहे…

  2. atmaram-jagdale

    छान हलका फुलका लेख आवडला .

Leave a Reply