फोटो (कथा - ऑडीओसह)

पुनश्च    अज्ञात    2020-10-21 06:00:46   

अंक : एकता, पौष १८७८  म्हणजे  १९५६ 

कथेबद्दल थोडेसे : साहित्य दोन प्रकारचे असते. एक- जे काळाच्या पुढचे असते आणि कुठल्या ना कुठल्या अर्थाने ते कायम कालसुसंगत राहते. दोन- जे एका  काळाचा ठसा घेऊन निर्मिले जाते, कालांतराने ते कालबाह्य ठरते परंतु त्या काळाचा अभ्यास करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. आज आम्ही ऐकायला आणि वाचायला दिलेली फोटो ही कथा दुसऱ्या प्रकारातली आहे. या कथेचा बाळबोध स्वभाव, त्यातील विचारभोळेपणा, संस्कार करण्याची धडपड , चांगले-वाईट ठरविण्याच्या बालिश कसोट्या आणि नाटकी ह्दयपरिवर्तन हे सगळे १९५६चा सामाजिक स्वभाव सांगते. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दशकही लोटले नव्हते. तरुणांनी समाज, देश घडवावा, नको त्या गोष्टींच्या नादाला लागू नये याची जबाबदारी साहित्यानेही आपल्यावर शीरावर घेतली होती. त्यातून जे साहित्य त्या काळात जन्माला आले, त्याचे प्रतिनिधित्व ही कथा करते. अवश्य वाचा किंवा ऐका, म्हणजे याचा प्रत्यय येईल.********

सकाळी ९ वाजण्याची वेळ. लक्ष्मी रोडने श्रीधर आपल्या मित्राबरोबर गप्पा मारीत चालला होता. एकाएकी तो थांबला.

“अरे हाच तो प्रकाश स्टुडिओ” असे म्हणत श्रीधर सदाला बरोबर घेऊन स्टुडिओत शिरला व त्याने सदाला विचारले “बरं सदा! तुला आता कसा फोटो काढावयाचा आहे?”

या त्याच्या प्रश्नाने सदा जरा गोंधळल्यासारखा झाला. कारण त्याला श्रीधरच्या प्रश्नाचा नीट अर्थच समजला नाही. तो एकदम म्हणाला, “कसा म्हणजे काय? कॉलेजच्या आयडेन्टिटी कार्डाला लागतो तसा.”

“अरे तसं नाही, म्हणजे कुठल्या पोजमध्ये काढावयाचा?” श्रीधरने आपल्या प्रश्नाचा खुलासा केला.

“सरळ खुर्चीवर बसून.” सदाने त्याला आपले सरळ उत्तर दिले. सदाचा फोटो काढून झाल्यावर त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


कथा , एकता

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.