fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

माझी Nano सवारी!मी पुण्याची.. त्यामुळे मला सायकल, स्कूटर, बाईक्स चालवता येते हे वेगळे सांगायला नकोच. वयाच्या १९व्या वर्षापासून टू व्हीलर चालवायचे. पुण्यात सरसकट सगळ्याच वाहनांना “गाडी” शब्द वापरायचो. लग्नानंतर मुंबईला आल्यावर ह्या ‘गाडी’ शब्दावरून बरेच टोले खाल्ले..अगं, गाडी काय? गाडी म्हणजे four wheeler. Scooty म्हण किंवा बाईक म्हण..” इत्यादी इत्यादी. पण ह्या सगळ्यात मला जाणवले ते म्हणजे आपल्याला four wheeler चालवता येत नाही. आम्ही मारुती 800 घेणार होतो म्हणून आम्ही नवरा-बायको दोघांनीही driving school ला नावं टाकली. मी शिकताना तो मागे आणि तो शिकताना मी मागे आणि ट्रेनर driving seat च्या बाजुला.

नवऱ्याने ह्यापूर्वीच मुंबई-पुणे हायवे वर आर्माडा चालवली होती त्यामुळे त्याची confidance level बरीच वर होती. तर त्यावेळी नोकरी नाही, नवीन शहर, नवे रस्ते ह्यामुळे माझी मात्र अगदी नेहेमीप्रमाणे शून्याच्याही खाली होती. एकीकडे स्टीअरिंग सांभाळा, आरशांमधून मागे बघा, क्लच दाबा, गिअर्स बदलताना त्या ट्रेनरच्या हाताचा स्पर्श चुकवा…ह्यात माझी तारांबळ उडे.  ब्रेक दाबता येत नाही ह्याचा तर मला न्यूनगंडच आला होता. अचानक कोणी मध्ये आलं, वळताना किंवा खड्डा आला तर माझ्या अंदाजाने मी ब्रेक दाबण्यापूर्वी  माझा नवरा “ब्रेssssक, उडवशील कोणालातरी” असं काळजीने ओरडायचा आणि माझे पाय त्या ब्रेक वर जाण्यापूर्वीच ट्रेनर त्याच्यासमोरचा जोडलेला ब्रेक दाबून मोकळा झालेला असायचा.  गाडी सुरु होतानाच सारखी बंद पडायची. स्टीअरिंग फिरवताना इकडे तिकडे पहिलं तर गाडी भलतीकडेच जायची आणि ट्रेनर मला, “मेडम, किधर जा रही है?” असं उपहासाने म्हणतोय असं मला वाटायचं आणि मला आराश्यामधून मागच्या सीटवरून माझा नवरा गालातल्या गालात हसताना दिसायचा. एरवी झाशीच्या राणीप्रमाणे बाईकवर स्वार होऊन गर्दीतून लीलया पुढे जाणारी मी, पण इथे मात्र माझा अगदी भित्रा ससा झाला होता.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 17 Comments

 1. महिलांचे प्रतिनिधित्व करणारा. स्वानुभवाने स्मरण करुन देणारा लेख. म्हणूनच मनापासून भावला

 2. Wah! mastach lekh.

 3. आपला लेख सौ.ला मी मुद्दाम वाचायला देणार.
  गेली १५ वर्षे तिला गाडी शिकवतो.
  धन्यवाद .

 4. खूप छान सुकू…I m going through the same situation right now…..बघू कधी जमतंय मला…😊

 5. Khup Sundar sukruta…….sagala samor ghadtay asa vatala. Mala kuthalach vahan chalavta yet nahi. He vachalyawar vatatay mala pn Jamel.

 6. सुकृता नेहमी प्रमाणे सहज सुंदर..
  चारचाकी चालवू इच्छिणाऱ्या पण मनात भिती असणाऱ्या , विशेषतः स्त्री वर्गाची मॉडेल होणार आता तू…

 7. Suku sahaj ani Sundar lihil aahes
  Tuza aajun ek pailu disala
  Keep writing dear!

Leave a Reply

Close Menu