इंग्रजांचं भीमा-कोरेगाव : भाग ४ आणि ५

पुनश्च    किरण भिडे    2018-01-25 20:28:15   

मागच्या भागात आपण पाहिले की २ जानेवारीला कोणतीही विशेष लढाई न करता स्टॉन्टनचे इंग्रजी सैन्य आले तिथून शिरूरकडे निघून गेले. मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे न वळता साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. स्टॉन्टनला कोणाचीही मदत आली नाही पण मराठा सैन्य निघून गेल्याने तो बचावला. स्टॉन्टनचा कोणत्याही प्रकारे जय झाला नाही किंवा मराठ्यांचा पराजय झाला नाही कारण तसे झाले असते तर पेशव्याला आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपतींना पकडायला स्टॉन्टन त्यांच्या मागावर गेला असता पण तसे काहीच झाले नाही. उलट पुण्याची कुमक करायला निघालेला स्टॉन्टन आल्या वाटेने पुन्हा शिरूरला निघून गेला. एलफिन्स्टन पुणे दरबारात कंपनीचा रेसिडंट होता. या पूर्वीच्या रेसिडेंट असलेल्या बॅरी क्लोजचा आणि पेशव्याचा बऱ्यापैकी सलोखा असल्याने इंग्रज 'घुसखोरी' करण्याइतकी मजल मारत नसत. पण इ.स. १८११ मध्ये क्लोजच्या जागी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनची नेमणूक झाली आणि इंग्रजांच्या पुणे दरबारातील हालचाली पूर्णपणे बदलल्या. एल्फिन्स्टनने मराठ्यांचे पूर्ण राज्य गिळंकृत करण्याचा डाव रचला, आणि गंगाधरशास्त्र्याच्या खुनापासून याची सुरुवात झाली. शास्त्र्याच्या खुनाच्या आरोपात त्रिंबकजीला अडकवून त्याकरवी बाजीरावावर दबाव आणून एल्फिन्स्टनने युद्धाला सुरुवात करण्याचा मोठा डाव रचला. बाजीरावाचीही यावेळी युद्धाची तयारी सुरूच होती आणि अखेरीस ठिणगी पडली. कोरेगावची लढाई झाली तेव्हा एलफिन्स्टन चाकणच्या जवळपास होता. एलफिन्स्टन त्याची एक रोजनिशी लिहीत असे. ह्यात महत्त्वाच्या घटना अथवा लढाया ह्याच्याबद्दलचे त्याचे स्वतःचे विचार त्याने लिहिलेले आहेत. एलफिन्स्टनच्या सगळ्या डायऱ्या ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेल्या आहेत. ह्या कोरेगावच्या लढाईबद्दल एलफिन्स्टनचे काय मत होते त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , राजकारण , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    Hmm.....tyavelchya vastusthitichi kalpana aali aataa! Bariksarik tapashil dilyamule lekh vachaniya zalaay!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen