इंग्रजांचं 'कोरेगाव-भीमा': भाग ३

पुनश्च    किरण भिडे    2018-01-14 17:21:48   

मागच्या लेखात आपण १ जानेवारी १८१८च्या सकाळच्या घडामोडी बघितल्या. इंग्रजांचा किंवा मराठ्यांचा - कोणाचाही निश्चित विजय झालेला नव्हता. मराठ्यांना त्यांनी पेचात पकडलेल्या स्टॉन्टनच्या छोट्याश्या सैन्यावर विजय मिळवून काही फारसे साध्य होणार नव्हते कारण ह्या इंग्रज सैन्यात कोणी मोठा अधिकारी किंवा महत्त्वाचा माणूस नव्हता. मराठा सैन्यात बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे मंडळींबरोबर दुसरा बाजीराव पेशवा आणि प्रत्यक्ष सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज होते. ह्यांची छावणी नदीच्या दक्षिणेला होती. स्टॉन्टनला कोणतीही पुढची इंग्रजी कुमक यायच्या आत ह्या खाश्याना सुखरूप पुढच्या मुक्कामी पोहोचवणे हे मराठी सैन्याचे मुख्य ध्येय होते. त्यामुळे कोरेगावचा वेढा फारसा ताणण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते. १ जानेवारीच्या रात्री मराठी फौजा हळूहळू मागे फिरून पेशव्याच्या दिशेने जाण्याचा विचार करू लागल्या होत्या. या काळात नदीच्या पलीकडे असणारा पेशवा स्वतः छत्रपतींसह तेथून निघून जाऊन राजेवाडीच्या मुक्कामावर गेला होता. इंग्रज सैन्याचे भरपूर नुकसान झालेले होते. जरी दोन्ही तोफा ताब्यात असल्या तरी मद्रास आर्टिलरीमधले जवळपास सगळे सैनिक आणि अधिकारी मारले गेलेले किंवा जायबंदी झालेले होते. सैन्याला ४८ तास अन्न किंवा पाणी मिळालेले नव्हते पण तरीही ते स्टॉन्टनच्या निर्णयानुसार शरण न जाता त्याच्यावर विश्वास ठेऊन तसेच थांबलेले होते कारण स्टॉन्टनला आशा होती की कर्नल स्मिथ किंवा कर्नल बरची मदत लवकर येईल. स्मिथ आणि बर हे दोघेही त्यांच्या सैन्यांच्या तुकड्या घेऊन पेशव्याच्या मागावर निघालेले होते त्यामुळे पेशव्याचा माग काढत ते कोरेगावाजवळ येतील ही स्टॉन्टनची अटकळ अगदीच चुकीची नव्हती असे नक्कीच म्हणता येते. पण हे असल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , राजकारण , सोशल मिडीया , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  धन्यवाद. त्यावर काम सुरु आहे. लवकरच ते होणे अपेक्षित आहे. झालं की लगेच कळवतो.

 2. जयदीप गोखले

    4 वर्षांपूर्वी

  प्रत्येक लेखाच्या खाली दिलेल्या लिंक चालत नाही आहेत. उदाहरणार्थ ह्या लेखाच्या खाली ३ लिंक आहेत, भीमा कोरेगाव, इतिहास आणि इतिहासाच्या पाऊलखुणा. म्हणजे जर भीमा कोरेगाव ही लिंक दाबली तर सर्व भीमा कोरेगाव निगडित लेख एकत्रित दिसणे अपेक्षित आहे, जे होत नाही आहे. कृपया तपासून पहा.

 3. Jaya

    4 वर्षांपूर्वी

  आभार .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen