बाळशास्त्री हे विद्वान होते. ते आपले काम चोख रीतीने करीत होते. पण इतके म्हटल्यानेच त्यांच्या योग्यतेचे वर्णन संपत नाही. त्यांना आपल्या लोकांमध्ये त्यावेळी स्पष्ट दिसलेले सामाजिक बाबतींतले धर्मसंबंधाचे वगैरे दोष घालवून त्यांचे ठिकाणी स्वाभिमान व कर्तव्यतत्परता हे गुण जागृत करावयाचे होते. सन १८१८ साली पेशवाई बुडाली हे खरे. परंतु त्यावेळी महाराष्ट्राची जी हरएक दृष्टीने दुःस्थिती झाली होती ती बाळशास्त्री यांच्या वेळी जवळजवळ कायम होती किंबहुना कष्टतरच झाली होती! ती शास्त्रीबोवांना—एका मनुष्यास शक्य असेल तेवढी सुधारून लोकांस जागे करून त्यांना कार्यक्षम करावयाचे होते. म्हणजे समाजांत त्यांना नवजीवन उत्पन्न करावयाचे होते. या राष्ट्रकार्याला ते सर्वथैव लायक होते व ते हे देशाचे काम मोठ्या हौसेने व कर्तव्यनिष्ठेने करीत होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .