बाराच्या सुमारास अंथरुणावर पडलों, पण झोप येईना. पहाटे ३॥ ला निघून ४ ला आम्हांला खडकवाला येथें पोहचावयाचें होतें. कारण विनोबाजी महाराष्ट्र सीमेंत सूर्योदयानंतर कांहीं मिनिटांनी प्रवेश करणार होते. म्हणून लग्न-घटका चुकूं नये यासाठीं भास्कराचार्यानी जेवढी काळजी घेतली नसेल तेवढी काळजी मी घेतली. लीलावतीचें भविष्य अटळ तें टळलें नाहीं. मी मात्र प्राप्त क्षणाच्या आधींच अर्धा तास तेथें पोहोंचलों होतों. प्रयत्न करूनहि झोप येईना. विनोबा संबंधीचे विचार चालूच होते. त्यांच्या कार्याचे पर्वत डोळ्यापुढे येत होते. त्यांच्या टीकाकारांचीं शरसंधानें नजरेंतून सुटत नव्हती आणि विचार करतां करतां झोंप येते असा अनुभव असल्यानें अधिक विचार करणें सुरू झालें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .