आणि सगळीकडे शांतता पसरली

पुनश्च    तंबी दुराई    2018-01-21 06:00:07   

उध्दवराव नुसते तळमळत होते. त्यांचा संपूर्ण उजवा पाय गेला आठवडाभर दुखत होता. रश्मी वहिनींची झोप उडाली होती कारण रात्रभर उद्धवरावांचे पायोपचाराचे प्रयोग सुरू होते. कधी ते पायाखाली उशी घेत, तर कधी उशीवर पाय घेत. कधी गरम पाण्याचा शेक घेत तर कधी बर्फाचा खडा रूमालात बांधून त्याने पाय शेकत. कधी गुडघ्याला क्रेप बँडेज बांधत तर कधी पोटरीला बँडेज बांधून घेत. हे सगळे अर्थातच रश्मी वहिनींच्या मदतीने सुरू होते, त्यामुळे त्यांचीही झोप होत नव्हती. गेल्या शनिवारी रात्री अचानक उद्धवरावांच्या उजव्या पायाची टाच दुखायला सुरूवात झाली आणि रात्रभरात टाचेतले दुखणे पोटरीपर्यंत आणि तिथून कंबरेपर्यंत पसरत गेले. रविवारी सकाळी तर त्यांना पाय उचलणेही कठीण झाले. या गोष्टीला आता आठवडा उलटून गेला होता पण पायाचं दुखणं काही कमी होत नव्हतं. उध्दवराव नुसते तळमळत होते. नाटकातल्या व्यक्तिरेखेनं रंमंचावर अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरावं तसे मिलिंद नार्वेकर हाताची घडी घालून फिरत होते. आदेश भाऊजींनी तर गेला संपूर्ण आठवडाभर घरातच तळ ठोकला होता. उध्दवरावांच्या पायाविषयी कळल्या कळल्या त्यांनी मातोश्रीवर धाव घेतली आणि येताना सिद्धिविनायकाचा प्रसाद, अंगारा आणि आशीर्वाद घेऊनच ते आले. तेलकट,तुपकट आणि गोड याची मनाई असल्यानं उध्दवराव लाडू वगैरे खातच नाहीत, पण प्रसादाला नाही कसं म्हणायचं म्हणून त्यांनी त्यातले बुंदीचे दोन दाणे खाल्ले. वहिनींनी अंगारा कपाळावर लावला पण काही उपयोग झाला नाही. आदेश भाऊजी दर अर्ध्या तासाने ‘बरं वाटतंय का आता?’ असं विचारत होते. जणू बरं वाटलं नाही तर सिद्धिविनायकाचा महिमा कमी झाल्याची अफवा पसरेल की काय अशी भीती त्यांना वाटत होती. आदेश भाऊजी मातोश्रीवर पोचल्याचं कळल्यावर अमोल कोल्हेही पोचल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. amarpethe

      3 वर्षांपूर्वी

    झकास

  2. किरण भिडे

      3 वर्षांपूर्वी

    अनंत जी, आपण ७ जानेवारीला पुनश्च चे सभासदत्व घेतलेत. ते वार्षिक सशुल्क सभासदत्व होते. त्याचे सभासद म्हणून तुम्ही पुनश्च वर प्रसिद्ध होणारे लेख वाचू शकता. पण तंबी दुराई हा सशुल्क ब्लॉग आहे जो दर रविवारी प्रसिद्ध होतो. त्याचे अतिरिक्त ५० रुपये भरून वार्षिक सभासद होऊ शकता. तुम्ही जो login चा प्रयत्न करताय तो पुनश्च वरील लेख वाचण्यासाठी? की तंबीचे? तंबीचे तुम्ही सभासद नसल्यामुळे login होणार नाही. पुनश्च वर login होत नाहीये? म्हणजे ७ जानेवारीनंतर तुम्ही आज पहिल्यांदाच प्रयत्न करताय login चा? कृपया कळवावे म्हणजे योग्य ती मदत करता येईल.

  3. अनंत पालव

      3 वर्षांपूर्वी

    सभासद होऊन देखील लेख वाचता येत नाहीत. ४ तास लाँगीन चा प्रयत्न केला. १००/- रु. फुकट गेल्याच दुःखा पेक्षा लेख वाचता येत नाहीत याचच सल जास्त आहे. कृपया नोंद घ्यावी .विनंती.

  4. किरण भिडे

      3 वर्षांपूर्वी

    नमस्कार. आपण ७ जानेवारी रोजी १०० रुपये भरून पुनश्चचे वार्षिक सभासदत्व घेतले आहे. त्यानुसार आपण पुनश्चवर प्रसिद्ध होणारे दर आठवड्याला २ लेख वाचू शकता. ते लेख पुनःप्रसिध्द असतात. तंबी दुराई हा ताज्या लेखांचा सशुल्क ब्लॉग आहे जो दर रविवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याचे अधिकचे ५० रुपये आपणास भरावे लागतील जे आपण सभासद विभागातून भरू शकता. काही अडचण आली तर जरूर कळवा.

  5. rushikeshgawade

      3 वर्षांपूर्वी

    कृपया करून आपण लक्ष देऊन मला सदरील लेक वाचता यावा ह्या कमी मद्दत करावी

  6. rushikeshgawade

      3 वर्षांपूर्वी

    Logged in as rushikeshgawade Account Status Active Membership वार्षिक सभासद २०१७-१८ Account Expiry 31/12/2018

  7. Prashant Jagtap

      4 वर्षांपूर्वी

    I have successfully subscribe for your punnash app & tubing durai. Thanks for such excellent service in Marathi.

  8. Prashant Jagtap

      4 वर्षांपूर्वी

    I have successfully subscribe for your punnash app & tubing durai. Thanks for such excellent service in Marathi.

  9. aparna kelkar

      4 वर्षांपूर्वी

    सबस्क्राइब कसे करावे ते सांगा

  10. vijaypatilrit

      4 वर्षांपूर्वी

    I have already a register member.

  11. किरण भिडे

      4 वर्षांपूर्वी

    www.punashcha.com/subscribe या लिंकवर जा आणि सशुल्क किंवा सशुल्क+तंबी असे सभासदत्व घ्या.

  12. bookworm

      4 वर्षांपूर्वी

    Achuk Nidaan! Chhan prahasan!

  13. सूर्यकांत देशमुख

      4 वर्षांपूर्वी

    how to become a member how to subscribe please explain

  14. सूर्यकांत देशमुख

      4 वर्षांपूर्वी

    how to subscribe आपले सभासद व्हायचे आहे ते कसे करायचे



वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.