निराश होण्याची सवय

पुनश्च    डॉ. यश वेलणकर    2018-01-28 09:17:55   

छोटी जुईली चालायला शिकत होती. उभे राहून शरीराचा तोल सांभाळत तिने एक पाउल टाकले की सर्वजण टाळ्या वाजवून तिचे कौतुक करायचे. दोन,चार पावले टाकून झाली की तिचा तोल जायचा,ती पडायची. ते पहाताना मी विचार करू लागलो की चालता येणे हे देखील केवढे अवघड कौशल्य आहे. आपण सर्वजण पहिली पावले टाकताना असेच धडपडलो असणार,पडलो असणार. पण त्यावेळी आपण निराश झालो नाही. प्रयत्न चालू ठेवले. आता आपण आपल्या नकळत चालत असतो,मनात असंख्य विचार येत असतात,आणि पाउले आपोआप पुढे पडत असतात,शरीराचा तोल सांभाळला जात असतो. दोन पायांवर तोल सांभाळत उभे राहणे ,त्यातील एक पाय उचलून पुढे टाकणे हे  कधीकाळी आपल्याला खूप अवघड वाटत असणार पण त्याची आठवणहि आता होत नाही. चालण्याचा नियमित सराव केला की ते सवयीचे होऊन जाते,आपल्या  नकळत होऊ लागते.

तोल सांभाळणे,चालणे,सायकल चालवणे,बाईक चालवणे हि सर्व कौशल्ये म्हणजे आपल्या सवयीच आहेत. जे काही आपोआप,आपल्या नकळत घडते ती सवय ! सुरुवातीला गाडी चालवताना क्लच सोडत गाडीला वेग देणे जमत नाही,गाडी अनेकवेळा बंद पडते. पण गाडी चालवणे एकदा सवयीचे झाले की या सर्व कृती आपोआप होऊ लागतात. ड्रायव्हर शेजारच्या माणसाशी बोलत असतो आणि त्याचे पाय त्याच्या नकळत काम करीत असतात.

अशी सवय लागणे आपल्या विकासासाठी खूप आवश्यक आहे. कल्पना करा की छोट्या जुईलीला चालताना जे कष्ट घ्यावे लागत आहेत ,तसे आपल्याला आयुष्यभर घ्यावे लागले तर चालण्याच्या पुढे आपली प्रगतीच झाली नसती. एखादी कृती सवयीची होते म्हणजे मेंदूतील महत्वाची केंद्रे त्यांचे काम दुसऱ्या केंद्रांवर सोपवतात. एखादी कंपनी किंवा संघटना विकसित होत असताना त्यातील प्रमुख व्यक्ती आपल्यालां सहाय्यक माणसे नेमतात आणि काही कामे त्यांच्याकडे सोपवतात,तसेच मे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


मेंदू संशोधन , आरोग्य , मनसंवाद , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.