तू आता १३६ वर्षे निवांत झोप !

चार्ल्स डार्विन त्याच्या थडग्यात शांत पहुडलेला होता. मानवजातीच्या उत्क्रांतीचा विचार करून आणि निसर्गाच्या चमत्कारांमागील शास्त्रीय मीमांसा शोधून शोधून, अभ्यास करून थकलेला त्याचा मेंदू आणि देह गेली १३६ वर्षे या थडग्यात विश्रांती घेत होता. थडग्यात आला तेव्हा तो ७३वर्षांचा होता. म्हणजे आता त्याचं वय २०९ वर्षे होतं. माणूस एकदा थडग्यात आला की पुढची वर्ष मोजण्यात काही अर्थ नसतो, कारण प्राण नसलेल्या देहाची अधिक उत्क्रांती होऊ शकत नाही. पण आपण आहोत, आपलं अस्तित्व आहे आणि आपल्याला आता विश्रांतीची गरज आहे एवढं त्याला कळत होतं. तो असा शांत, क्लांत पडून असताना अचानक थडग्याचं दार ठोठावलं गेलं. खरंच कोणी ठोठावतंय की भास आहे हा? असा प्रश्न डार्विन स्वतःलाच विचारतोय तोवर थडग्याच्या दारावर पाठोपाठ जोरजोरात वाजवलं जाऊ लागलं. जणू कोणीतरी अत्यंत अधीर होऊन दार ठोठावत होतं. १३६ वर्षांच्या डार्विनच्या एकांतवासाला त्यामुळं तडा गेला. तहान, भूक, इच्छा, वासना यांच्या पलीकडे गेलेलं त्याचं २०९ वर्षांचं अस्तित्व कसंबसं उठून उभं राहिलं. एवढ्या वर्षांनी उठल्यामुळं त्याचा आधी तोल गेला. कसं बसं स्वतःला सावरत त्यानं थडग्याचं दार उघडलं.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 13 Comments

  1. mahendranene

    लेख अतिशय आवडला

  2. amarpethe

    वेगळा विचार, छान आहे

Leave a Reply