नाथांघरचे दुखरे पत्र,दादांघरचे खुपरे उत्तर !


आम्ही मराठी आणि त्यातही इतिहासाचे अतिच प्रेमी असल्यामुळे आम्हाला (इतरांची) दप्तरे धुंडाळण्याचा शौक जन्मतःच आहे. अशीच अलिकडची काही दप्तरे उलटी पालटी करून बघताना आम्हाला दोन पत्रांचा शोध लागला. महाराष्ट्रातील दोन वजनदार परंतु अलिकडे ‘वजन कमी झालेल्या’ राजकीय व्यक्तींनी एकमेकांना लिहिलेली ही पत्रे आहेत. त्या व्यक्ती कोण आहेत याचा थांग आणि पत्ता ती पत्रे वाचता वाचताच आपल्याला कदाचित लागू शकेल.

आदरणीय रा. रा. दादा, नमस्कार,

तसे हे पत्र लिहिण्यास कारण आहेही आणि नाहीही. आपण राजकारण करतो, तेव्हा आपण अकारण काहीच करत नाही. मी इथे जळगावात राहून नुसता जळतो आहे आणि तिकडे माशाचे कालवण (यात मी हुषारीने तुमचे गाव सांगितले आहे ते तुमच्या लक्षात आले का?  हल्ली मला अशीच आडून आडून बोलायची सवय लागलेली आहे.) खाता खाता नाराजीचा काटा सतत तुमच्या घशात अडकलेला असतो, याची मला जाणीव आहे. नाराजी हा आपल्या दोघांमधल्या सूप्त स्नेहाचा धागा आहे, त्यामुळेच मला हे पत्र लिहावेसे वाटले. तुम्हाला अलिकडे बऱ्याचदा टीव्हीवर पाहिले आहे. तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची धमकी दिल्यापासून तर प्रत्यक्षात पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा करण्यापर्यंतचा तुमचा सगळा प्रवास मी टीव्हीवरच पाहिला. खरं तर तुम्हाला एकदा प्रत्यक्षच भेटणार होतो, परंतु ‘शोले’मधील हरीराम न्हाव्याप्रमाणेच सध्याच्या नेतृत्चाचे जासूस चारो और फैले हुए है, याचा अनेकदा अनुभव आल्याने, तुम्हाला भेटायचे मी टाळले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Vilas15

      4 वर्षांपूर्वी

    i m from jalgaon so classic example of the situation here

  2. amarpethe

      7 वर्षांपूर्वी

    अफलातून

  3. Vaishali Chavan

      7 वर्षांपूर्वी

    सही..

  4. Ninad Acharya

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम.... हा खरा तंबी दूराईंचा लेख वाटतो.

  5. पृथ्वीराज

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख. हे फक्त तंबी दुराईच लिहू शकतात.

  6. Kedarkurlekar

      7 वर्षांपूर्वी

    ??????

  7. Prashant Jagtap

      7 वर्षांपूर्वी

    ??????☝?

  8. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    धम्माल चिमटे भाऊंचे आणि दादांचे! मजा आली वाचताना!??



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen