शाह पकोडा भंडार!

पुनश्च    तंबी दुराई    2018-02-11 06:00:56   

आमचे येथे सर्व प्रकारचे पकोडे तळून मिळतील. आम्ही फक्त अस्सल अहमदाबादी बेसन आणि भडोच येथील दर्जेदार शेंगदाण्याचे शुद्ध तेल वापरतो. आमच्या येवढी विविधता तुम्हाला कुठेच मिळणार नाही. सर्व प्रकारच्या पकोड्यांसाठी विश्वसनीय ठेला..'  शाह पकोडा भंडार '.. आमचे येथे मिळणारे पकोड्याचे विविध स्वादिष्ट प्रकार- हिंदू पकोडा. हिंदू अस्मितेचे दळण दळून दळून राजकारणाच्या जात्यातून खाली पडलेले बेसन आम्ही भगव्या वस्त्रातून गाळून घेतो. काही चुकार हिरवे हरबरे पिवळ्या डाळीत लपून येतात आणि जात्याच्या पात्यांमधूनही निसटून खाली येतात. भगव्या वस्त्रांमधून मात्र ते खाली पडू शकत नाहीत. त्यांना आम्ही मग खड्याप्रमाणे बाजूला काढतो. अशा प्रकारे शुद्ध आणि एकजात, एका पोताचे झालेले बेसन मग गंगेच्या शुध्द पाण्यात भिजवले जाते. नाठाळ बैलांना घाण्याला जुंपले जाते, त्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधल्या जातात, जेणे करून त्यांना आपण कोणाचे तेल काढतो आहोत, याचा पत्ता लागू नये. मग भडोचमधून मागवलेला खास शेंगदाणा घाण्यात टाकून जणू काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत असे समजून त्यांचे तेल काढले जाते. तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा, निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना बाजूला फेकावे तसा आम्ही फेकतो. त्यांचा पूनर्वापर करत नाही. त्यानंतर सत्तेच्या कढईत हे तेल चांगले तापवले जाते. तेलाला उकळी येताच सारख्या आकाराचे, सारख्या रंगांचे सुबक पकोडे आम्ही तळतो. इतिहास पकोडा आमच्या व्यतिरिक्त इतर अनेकांचे पकोड्यांचे ठेले आहेत. त्यांनी आधीच तळून ठेवलेले पकोडे आम्ही नव्याने, आमच्या पध्दतीने तळतो. त्यालाच आम् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. Vilas15

    2 वर्षांपूर्वी

  fantastic, no other word for this

 2. Rdesai

    3 वर्षांपूर्वी

  हा--हा---हा

 3. amarpethe

    4 वर्षांपूर्वी

  मस्त आहेत पकोडे

 4. sujata17

    4 वर्षांपूर्वी

  खुसखुशीत पकोडे ! कर्ज बुडव पकोडे या नव्या प्रकाराबद्दल मात्र यात माहिती दिलेली नाही. ;-)

 5. Ashfaq

    4 वर्षांपूर्वी

  परफेक्ट

 6. Kedarkurlekar

    4 वर्षांपूर्वी

  नेहमी प्रमाणे खुसखुशीत नाही. Not usual Tambi....

 7. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  मार्ग शोधलाय. पुढील app update मध्ये तो आपणास वापरता येईल. तो update आला की कळवेनच. ८-१० दिवसात व्हायला हवा.

 8. sujatananded

    4 वर्षांपूर्वी

  Nice to meet Tambi Durai......Two Full ,One half plate of Tasty Pakodas..with a variety of Chatanies..!!

 9. psirane

    4 वर्षांपूर्वी

  सतत लॉग इन करावे लागते हे त्रासदायक होते. काहितरी मार्ग शोधा.

 10. Tulasidas

    4 वर्षांपूर्वी

  Ha Pakoda pudhchya niwadnuki nanter gayab honar. Mhanun atach kha.

 11. madhavjoshi

    4 वर्षांपूर्वी

  have tase khuskhushit nahi zale pakode

 12. Prashant Jagtap

    4 वर्षांपूर्वी

  ??

 13. विनय सामंत

    4 वर्षांपूर्वी

  2019 ला जर चहा पकोडे वर बंदी आली नाही तर मग ते राष्ट्रीय खाद्य होणार...

 14. Sumant Bandale

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख

 15. Prakash Khanzode

    4 वर्षांपूर्वी

  खुसखुशीत पकोडे सकाळी सकाळी!

 16. Prakash

    4 वर्षांपूर्वी

  खुसखुशीत पकोडे सकाळी सकाळी!

 17. सूर्यकांत देशमुख

    4 वर्षांपूर्वी

  how to become member Please Guide

 18. Vaishali Chavan

    4 वर्षांपूर्वी

  क्या बात है..

 19. Kiran Joshi

    4 वर्षांपूर्वी

  मस्त टपल्या!????वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen