...आणि रात्रीचे ११.३० वाजले!


मोरुचा जन्मच मुळी इतरांनी त्याला मूर्ख बनवण्यासाठी झालेला असावा असं त्याला स्वतःला आणि सगळ्यांनाच वाटत होतं. मोरूची बायको, मोरूची मुलगी, मोरूचे शेजारी, मोरुचे मित्र, मोरुचे ऑफीसमधील सहकारी सगळ्यांसाठीच तो एक एप्रिलचा हमखास बकरा असे आणि हे गेली अनेक वर्ष सुरू होतं. आज एक एप्रिल आहे आणि आपण सावध राहिलं पाहिजे याचा त्याला विसर पडत असे आणि दिवसभर पावलोपावली मूर्ख बनत असे. सकाळी सकाळी मोरूची बायको त्याला  ‘अहो, आठ वाजले किती वेळ झोपणार?’ असं म्हणत हलवून जागं करणार. ‘बापरे, एवढा वेळ झोपलो मी? वाट लागली माझी, उशीर होणार पोचायला आणि माझा बॉस आज माझी बिना पाण्यानं करणार,’ असं म्हणत पांघरूण भिरकावत आणि बेडरूमच्या भींतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहात मोरु घाईघाईनं उठणार, ब्रशवर पेस्ट घेणार आणि झोपाळलेल्या डोळ्यानं दातांवर तो उभा-आडवा फिरवत हॉलमध्ये जाणार. मग सहज तिथल्या घड्याळाकडे त्याचं लक्ष जाणार आणि त्यात मात्र सकाळचे ६.३० वाजलेले असणार. त्याच्या हे लक्षात येता क्षणी बायको आणि मुलगी जोरानं ओरडणार, ‘बाबा एप्रिल फूल...!’ माणूस एकदा मूर्ख बनला तर ठिक, परंतु दरवर्षी तो असाच साध्या साध्या गोष्टीत मूर्ख बनत असे. आपल्या मागे लोक नक्कीच आपली याबद्दल टर उडवत असतील याची त्याला खात्री होती. या वर्षी मात्र त्यानं मनाशी निर्धार केला होता काहीही झालं तरी आपण एप्रिल फूल व्हायचं नाही. पावलोपावली सावध रहायचं. कुणाचाही डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. एक एप्रिलला नेमका रविवार आल्यानं त्याच्या बायकोची आणि मुलीची सकाळी सकाळी त्याला फसवण्याची नेहमीची ट्रिक यावर्षी चालणार नव्हतीच त्यामुळं तो बिनधास्त उशीरापर्यंत झोपला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. तंबी दुराई

      6 वर्षांपूर्वी

    धन्यवाद

  2. लतिका

      6 वर्षांपूर्वी

    सुरेख

  3. meena

      6 वर्षांपूर्वी

    नेहमी प्रमाणे खास



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen