जरा सरकून घ्या !

काळाच्या ओघात ‘सरकलेला’ या शब्दाला आलेला अर्थ आणि आपण सगळ्यांनीच एकमेकांना गेली अनेक वर्षे ‘जरा सरकून घ्या’ म्हणत स्वतःसाठी करुन घेतलेली जागा, यांचा नक्कीच जवळचा संबंध असावा. जागा अपुरी, संधी कमी, यंत्रणा तोकडी आणि इच्छा अमर्याद. मुंबापुरीच्या सार्वजनिक जगण्याचा भन्नाट लसावि काढत दत्तू बांदेकरांनी ‘जरा सरकून घ्या’ या तीन शब्दांत  इथल्या अवघ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे,त्यांच्या फर्मास ,तिरकस, खुसखुशीत शैलीत….

********

अंक: श्री दीपलक्ष्मी ; वर्ष-ऑक्टोबर १९५९

मंडळी, जरा सरकून घ्या ! तुम्ही स्वतः सरका आणि इतरांनाही सरकण्यास सांगा ! जगांत गर्दी फारच वाढली आहे. एकमेकांनी सरकून घेतल्याशिवाय आपला निभाव लागेल कसा ?

आगगाडीतून प्रवास करतांना, उतारू एकमेकांना धक्के देत म्हणतात, ‘जरा सरकून घ्या !’ सरकून घेतल्याशिवाय प्रवासाला गत्यंतरच उरले नाही.

मुंबई शहरांत वस्ती वाढली, तेव्हा लोक म्हणाले, ‘मुंबई, जरा सरकून घे.’ मुंबई सरकत सरकत गिरगावांतून दादरला गेली. तेथूनही सरकत सरकत मुंबई बोरीवलीपर्यंत गेली. मुंबईने कुर्ल्यापर्यंत आपली हद्द नेली. ह्या सरकून घेण्याच्या प्रकारामुळेच मुंबईची बृहन्मुंबई झाली.

मुंबई नगरीला जागा अपुरी पडूं लागली तेव्हा ती समुद्राला म्हणाली ‘सागरा, जरा सरकून घे !’ पण समुद्र ऐकेना !

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 12 Comments

 1. Apjavkhedkar

  लेख फार जुनाआहे पण मास्तआहेअथात सध्याच्या काळाला पण लागु पडतो.

 2. aghaisas

  बांदेकरांना १९५९ सालची लोकसंख्या ही गर्दी वाटली तर आजच्या गर्दीला त्यांनी काय म्हटले असते असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. की पूर्वीपासून लोकसंख्येच्या मानाने सुखसोई वा साधने ह्यांची कमतरता राहिल्याने तेव्हाची लोकसंख्याही बांदेकरांना गर्दी वाटली असे म्हणायचे?

  ह्या लेखानंतर लगेच काळाने बांदेकरांना नेणे ह्याला दैवदुर्विलास नाही तर काय म्हणायचे?

 3. Pushkar1210@gmail.com

  सन 1959 नंतरदेखील आजही तीच परिस्थिती आहे. फक्त इंग्रजी शाळा वाढल्या आणि मराठी शाळा कमी होत गेल्यात. मराठी शाळेत एकाच वर्गात निरनिराळ्या इयत्तांची मुले एकत्र बसूनसुध्दा वर्ग भरत नसल्यामुळे तेथेच फक्त ऐसपैस बसता येते.

 4. kiranshelke

  present tens in past.

 5. sureshjohari

  अप्रतिम

 6. ajitpatankar

  दत्तू बांदेकरांचा १९५९ सालचा लेख अप्रतिम आहे…. त्यांचे अफलातून निरीक्षण आणि उपरोधिक शैली भावली. त्यांनी वर्णन केलेली १९५९ सालची मुंबई आणि आजची मुंबई यात काडीचा फरक नाही… तपशिलात किरकोळ बदल करून हाच लेख आजच्या तारखेने छापला तरी कुणाला कळणार देखील नाही की हा १९५९ सालचा लेख आहे.
  मुंबई हे एक विलक्षण रसायन आहे.. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथांमधील मुंबईचे वर्णन वाचले तर ते देखील असेच आहे.. एवढच नाही तर गोविंद नारायण माडगावकर यांचे १८६३ (अठराशे त्रेसस्ठ) साली प्रसिद्ध झालेले “मुंबईचे वर्णन” हे पुस्तक वाचले तर सहज लक्षात येते की त्यावेळची मुंबई आणि आजची मुंबई यात फारसा फरक नाही.
  दोन उदाहरणे देतो..
  1) वर्षातून तीन चार महिनेपर्यंत कुत्रे मारावे असा एक या शहरात सरकारी कायदा होतं. त्याबरहुकूम प्रतिवर्षी जाहिराती छापून नाकोनाकी चिकटवीत. … मग सरकारी शिपाई आणि कुत्रेमारू लोकं रस्तोरती फिरून सापडेल त्या कुत्र्यास मारून टाकीत आणि त्याबद्दल त्यांस दर कुत्र्यास आठ आणे मिळत.. ( आजही भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम चालू आहे)
  2) सन १८६१ माहे ऑगस्ट महिन्यात मुंबईतील बहुतेक व्यापारी आणि सरकारी हुद्येवाल्या गृहस्थांनी सरकारास असा अर्ज केला की, मुंबईत दिवसेंदिवस जाग्याचा फार संकोच होत चालल्यामुळे किल्यातील राहणारांस फार अडचण पडत्ये, तर किल्याचे फक्त दक्षिण व पूर्व बाजूकडील तट कायम ठेवून बाकीचे सर्व मोडून त्याच्या भोवताले पाण्याचे चर आहेत ते बुजवून टाकून ही जागा कांपाच्या मैदानास मिळवावी. आणि ती लोकांस घरे, हपिसे, बंगले बांधण्यासाठी फरोक्त करून टाकावी. येणे करून दोन फायदे होतील. एक लोकास विस्तीर्ण जागा सापडेल व दुसरे ही जागा विकली की सरकारास पुष्कळ द्रव्य उत्पन्न होईल…( आजही मिठागरांच्या जागांवर घरे बांधण्याचा सरकारचा मानस आहे)

  मुंबई नगरी बडी बांका…

 7. Shridhar Godbole

  जरा सरकून घ्या म्हणणारा दुसरयाचे आयुष्य सरकून घेतो. एकदम मस्त बांदेकरसर

 8. mangeshnabar

  दत्तू बांदेकर यांना निव्वळ अलौकिक प्रतिभेचे जे वरदान लाभले होते त्याचा आविष्कार आपण वर दिलेल्या लेखांतून होतो. या बांदेकरांनी लिहिलेल्या आणि अशा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे काय ? आपणच हे करावे असे मी म्हटले तर कुणाची हरकत नसावी.
  मंगेश नाबर

 9. shubhada.bapat

  शेवट ध:स्स झाल. असो.
  आगगाडीत तर चौथीला बसताना तिसरीला सरका सांगून पुरत नाही.दूसरीला पहिलीला सांगा तरच

 10. bookworm

  अंतर्मुख झालो हा लेख वाचून…दत्तू बांदेकरांचे लेखन यापूर्वी वाचले नव्हते पण वाचकाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे. उपरोधाचा खूप चांगला वापर त्यांनी केलाय.बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे नाईलाजाने कराव्या लागणार्या तडजोडीचे चित्रण अंगावर येणारे आहे.या परीस्थितीतून आपण सगळे कधी ना कधी गेलेलो असल्यामुळे १९५९सालचा हा लेख वाचताना दत्तू बांदेकरांचे द्रष्टेपण लक्षात येते. क्या बात…!

Leave a Reply